agriculture news in marathi, raju shetty speak about planning of assembly election, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार ः राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित, कष्टकरी १७ संघटनांना प्रजा लोकशाही परिषेदेच्या माध्यमातून एकत्र करत विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे सांगितले. 

पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित, कष्टकरी १७ संघटनांना प्रजा लोकशाही परिषेदेच्या माध्यमातून एकत्र करत विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे सांगितले. 

शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध १७ संघटनांची बैठक शनिवारी (ता. १४) झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘धर्मांध शक्तीच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र आलो असून, वंचित आणि कष्टकरी जनतेचा आवाज मोदी आणि फडणवीस सरकारने दाबला आहे. वंचिताचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी निवडणुकीतील भूमिकेबाबत २० सप्टेंबर रोजी पुण्यात बैठक घेणार आहोत.’’
 
`...तर ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार`
कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्याबाबत शेट्टी म्हणाले, की या घोटाळ्याची व्याप्ती विविध राज्यांमध्ये असून, विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. या गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. ईडी सगळ्यांच्या घरी जाते, मात्र ईडीकडे जाणारा मी पहिला आहे. ईडीने चौकशी केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ईडीच्या कार्यालयावर मार्चा काढणार आहे. ईडीच्या कार्यालयावरील इतिहासातला पहिला मोर्चा असेल. 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...