महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
सात-बारा कोरा करणार असाल तरच पाठिंबा : राजू शेट्टी
पुणे ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करणे हा प्रमुख मुद्दा असल्यास आणि हे सरकार पुरोगामी विचारांनी चालणार असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल. त्यांचे संख्याबळ पुरेसे असल्याने त्यांनी आमची गरज भासणार नाही. त्यामुळे आम्ही सत्तेचे कोणतेही पद घेणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी (ता.१८) आयोजित वार्तालापात श्री. शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जाहीर केलेली भरपाई ही तोकडी आहे. सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ झालेले नाही. ज्याचे पीक कर्ज नव्हते, त्याच्या नुकसानीच्या तिप्पट नुकसान भरपाई राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या निकषांनुसार दिले जाणार होते. ते पण अद्याप मिळालेले नाही. ३७० कलम काढल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली अस्थिरता, अघोषित संचारबंदी आणि बर्फवृष्टीमुळे सफरचंद, केशर, अक्रोडचे मोठे नुकसान झाले. तेथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपतींची भेट घेणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
- 1 of 583
- ››