मंत्र्यांचे राज्यात दुष्काळी पर्यटन ः राजू शेट्टी

मंत्र्यांचे राज्यात दुष्काळी पर्यटन ः राजू शेट्टी

नागपूर  : राज्यात तीव्र दुष्काळ आहे. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. त्यातच टॅंकर माफियांनी हैदोस घातला आहे. सरकार मात्र अजूनही बघ्याच्याच भूमिकेत आहे. मंत्र्यांचे दौरे केवळ दुष्काळी पर्यटन ठरले आहे, अशी टीका  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी येथे केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. 

राज्यातील दृष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राजू शेट्टी सोमवारपासून  (ता.१०)  विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दौऱ्यामागील भूमिका विषद केली. चारा छावण्यांमध्येही पाणी, चारा नसून जनावरांची आबाळ सुरू आहे. आचारसंहितेचे कारण देत सरकारने वेळकाढू धोरण स्वीकारले. त्यानंतरही विजयाच्या जल्लोषात शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. अद्यापही दुष्काळ निवारणाची कामे कुठेही हाती घेण्यात आली नाहीत. शेतकरी अडचणीत असतील त्या प्रत्येक ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.  

साखर कारखाने अडचणीत आहेत. साखरेवर कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असूनही बॅंका ऐकायलासुद्धा तयार नाहीत. शासनाने साखरेचा बफ्फर स्टॉक करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे श्री. शेट्टी म्हणाले. लोकसभेचे निकाल संशयास्पद आहेत. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला केंद्राजवळ वायफायचे सिग्नल दिसत होते. तक्रार करताच ते गायब झाले. २५० हून अधिक मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात मोठी तफावत आहे. मतमोजणीत प्रारंभी विरोधक आघाडीवर असतात नंतर मात्र मागे पडतात. मागे पडण्याचे प्रमाणही सारखेच आहे. यामुळेच ‘ईव्हीएम’वर मतदान घेणे ही लोकशाहीची थट्टा असल्याची कुजबूज सुरू झाली असून ही अराजकतेकडे नेणारी स्थिती असल्याचे मत श्री. शेट्टी यांनी नोंदवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com