agriculture news in marathi, raju shetty take a review of damaged grapes, nashik, maharashtra | Agrowon

संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम करावा : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने तातडीने संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम करावा’, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.११) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा तालुक्यांतील द्राक्ष बागांना भेटी देऊन द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने तातडीने संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम करावा’, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.११) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा तालुक्यांतील द्राक्ष बागांना भेटी देऊन द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

या वेळी राजू शेट्टी म्हणाले की, ‘‘शासन शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करत अहे. शेतकरी संपूर्ण उदध्वस्त झाल्यामुळे त्यांची संपूर्ण पीक कर्जमाफी करावी. ज्या शेतकऱ्यांवर कर्ज नसेल अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एनडीआरफच्या तिप्पट मदत देण्यात यावी. अशी त्यांनी भूमिका मांडली. दौऱ्यामध्ये द्राक्ष पिकाचा विमा सक्षम करावा त्यामधील जाचक अटी शिथिल कराव्यात व नैसर्गिक आपत्ती, रोगराईला पर्याय म्हणून द्राक्षांच्या नवीन वाणांना मान्यता देऊन त्या वाणांची परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. पुढील पीक कसे घ्यायचे ? या चिंतेने शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. याबद्दल वेळीच विचार करावा,’’ असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील देवराम पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबास भेट देऊन शेट्टी यांनी त्या कुटुंबाचे सांत्वन केले.

अजून आमची काही मागणी नाही !
आम्ही पुरोगामी आघाडीत आहोत. भारतीय जनता पक्षाला आमचा विरोध आहे. पण ज्या काही नव्या घडामोडी होत आहेत. याबाबत अजून काही माहिती नाही. मी दौऱ्यात आहे. आमच्याशी कुणी संपर्क साधलेला नाही. नवीन आघाडी तयार झाली की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची आघाडी झाली. याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे अजून तरी काही मागणीचा प्रश्न येत नाही, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सकाळ - ॲग्रोवनशी बोलताना दिली. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...