agriculture news in Marathi, Raju Shetty urges farmers to fight unitly | Agrowon

शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे केले. 

आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे केले. 

आळेफाटा येथे तालुक्‍यातील सहकारी दूध संस्था व जुन्नर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे, दूध दरवाढीसंबंधीचे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विभाग अध्यक्ष प्रकाश बालवडकर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, बाळासाहेब औटी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुटे, रमेश शिंदे, आळे दूध संस्थेचे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, राजुरीच्या गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष गोविंद औटी, गोमाता दूध संस्थेचे अशोक गडगे, स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष राम कुऱ्हाडे उपस्थित होते. या वेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी हे हिशेबात घोटाळा करून फसवणारे मुनीमजी सरकार असल्याची खरमरीत टीकाही केली. आमदार शरद सोनवणे यांनी राज्याच्या विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी बजेटची मागणी केलेली असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी ॲड. संजय काळे, भीमाजी गडगे, प्रकाश बालवडकर, बाळासाहेब औटी, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक रोहिदास कुंटे यांनी, सूत्रसंचालन गणेश वाघमारे यांनी केले. रमेश शिंदे यांनी आभार केले.

राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व माझा कायम संघर्ष होता; पण त्यांनी कधीही शेतकरी चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला नाही. कारण, त्यांना शेतकऱ्यांची जाणीव होती.
- राजू शेट्टी, खासदार

 


इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
शेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी काम...नाशिक : ``सेंद्रिय कृषी उत्पादन कसे वाढेल....
पिकांच्या वाढीसाठी द्या शिफारशीत...प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट...
परभणीत ६५३ शेतीशाळांद्वारे बांधावर...परभणी : ‘‘कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
सांगलीतील १५ साखर कारखान्यांची धुराडी...सांगली : कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असतानाच...
सिंधुदुर्गाला पुन्हा पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (...
पुणे विभागात अडीच लाख हेक्टरवर पिकांना...पुणे ः पिके काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या...
मका, ज्वारी, बाजरीची १ नोव्हेंबरपासून...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय बाजरी, मका व ज्वारीची...
अकोल्यातील चराई क्षेत्रावरील...अकोला ः ग्रामीण भागात प्रत्येक गावातील गुरांना...
अमरावती जिल्ह्यात ६२ टक्के पीककर्ज वाटपअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोलापूर जिल्ह्यात सरसकट भरपाई द्या,...सोलापूर ः ‘‘गेल्या आठवड्यात  दक्षिण...
नवरात्रीमुळे फुलांच्या दरात वाढपुणे ः नवरात्रीनिमित्त फुलांना वाढलेली मागणी...
शिरापूर बंधाऱ्यावर स्वयंचलित दारांचे...सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर...
खानदेशात पावसाची हजेरी, पिकांना फटकाजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २१) दुपारी व...