Agriculture news in marathi 'Rakhrangoli' agitation in front of MP's house in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख रांगोळी' आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

नाशिक :कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग केला. या निषेधार्थ शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने खासदार डॉ. भारती पवार यांच्या नाशिक शहरातील घरासमोर ‘राखरांगोळी’ आंदोलन  केले. 

नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग केला. या निषेधार्थ शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने खासदार डॉ. भारती पवार यांच्या नाशिक शहरातील घरासमोर ‘राखरांगोळी’ आंदोलन करण्यात आले. या वेळी कांदा निर्यातबंदीच्या आदेशाची होळी करण्यात आली. 

केंद्र शासनाने नुकतेच शेतमाल सुधारणा विधेयक मंजूर केले. या नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा दिली आहे. युद्धासारखी आपत्कालीन परिस्थिती नसताना सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही. असा कायदा असताना ही निर्यातबंदी लादली. 
गेले सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर होते. त्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. बळीराजाच्या हातात दोन पैसे पडतील, अशी आशा होती.

मात्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. 

संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी व शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी, ही मागणी यावेळी करण्यात आली. 

शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा 

खासदार डॉ. पवार यांनी संसदेच्या अधिवेशनात कांदा उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडून कांदा निर्यातबंदी कायमची उठवावी व देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन खासदार डॉ. पवार यांना दिले.

आंदोलनावेळी कोविड-१९च्या सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी शांताराम जाधव, तानाजी जाडे, कचरू बागूल, सुरेश जाधव, रामनाथ ढिकले, शंकर ढिकले, माणिक देवरे, भानुदास ढिकले, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शेवले उपस्थित होते.  
 


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...