Agriculture news in Marathi Ram Bharose operates insurance company in Nanded | Page 2 ||| Agrowon

नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयच नाही...

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काम दिले आहे. परंतु कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी अद्याप स्वतंत्र कार्यालयच नाही.

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काम दिले आहे. परंतु कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी अद्याप स्वतंत्र कार्यालयच नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात केवळ औपचारिकता म्हणून एक टेबल-खुर्ची थाटली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत.   

नवा मोंढा भागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात एक टेबल खुर्ची मांडून कंपनीचे प्रतिनिधी बसतात. या ठिकाणाहून कंपनीचे काम चालते. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक असते. अशावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दावे दाखल करण्याची सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितली.अतिवृष्टीनंतर ७२ तासांत अनेकांना दावा दाखल करता आला नाही. ग्रामीण भागात त्यावेळी वीज नव्हती, अनेकांना संदेश वेळेवर मिळाले नाहीत. कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नव्हता. ॲपवर दावा दाखल करताना अडचणी आल्या. त्यामुळे अनेकजण वंचित राहिले आहेत.

पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी सध्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बसतात. त्यांना स्वतंत्र कार्यालय पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातात.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

मंडलात दोन वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर शेतातील पाणी काढावे लागले. यात वेळ गेल्यामुळे विमा कंपनीला ७२ तासांत कळविता आले नाही. यामुळे नुकसान होऊनही दावा दाखल करता आला नाही.
- संतोष भरकडे, शेतकरी, कोडगाव ता. लोहा.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...