रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश

रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश
रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे दिंडोरी-पेठ तालुक्याचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही शुक्रवारी (ता. २३) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  लोकसभा निवडणुकीदरम्यान रामदास चारोस्कर हे भाजप कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्या वेळी युतीचे काम करत ते व्यासपीठावर दिसून आले होते. शिवसेना की भाजप असे पर्याय असताना त्यांनी शिवसेना पक्ष निवडला. चारोस्कर यांच्या प्रवेशावेळी त्यांच्यासोबत दिंडोरीचे नगराध्यक्ष,  उपनगराध्यक्ष यासह पाच नगरसेवक, तीन पंचायत समिती सदस्य, दोन जिल्हा परिषद सदस्य यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. चारोस्कर यांनी शिवबंधन बांधल्याने याठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे. सध्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ राखीव असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे या ठिकाणी वर्चस्व आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेने मोट बांधली आहे. या प्रवेशावेळी खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार धनराज महाले आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com