शेतशिवारात साजरा होतोय रंगोत्सव...

विविध प्रकारच्या वनस्पतींना फुटलेली चैतन्याची पालवी, फुलोरा पाहून या पृथ्वीवर निसर्ग जणू रंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सवच साजरा करतोय, असेच दृश्‍य सध्या शिवारात दिसू लागले आहे.
Rangotsav is being celebrated on the farm
Rangotsav is being celebrated on the farm

रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो, तेव्हा शेतशिवारातील रंगपंचमी अनुभवायला मिळते. आज कोरोनामुळे रंगपंचमी साजरी करण्यास बंदी असली, तरी निसर्गाने आपला क्रम चुकवला नाही. विविध प्रकारच्या वनस्पतींना फुटलेली चैतन्याची पालवी, फुलोरा पाहून या पृथ्वीवर निसर्ग जणू रंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सवच साजरा करतोय, असेच दृश्‍य सध्या शिवारात दिसू लागले आहे. निसर्गाची रंगउधळण.. पहा video  

उन्हाळा सुरू झाला, की वातावरणात रखरख जाणवते. मात्र चैत्रपालवीने वातावरणातील रखरखीतपणा जाता आणि चैतन्य निर्माण होते. यातच वसंत ऋतूमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींना फुलांचा बहर आला आहे. यामध्ये पळस, पांगारा व काटेसाकाची फुले लक्ष वेधून घेत आहेत. तर शेतकऱ्यांना कीटकनाशक म्हणून उपयोगी पडणारा कडुनिंब इतक्या वर्षांनंतर सगळीकडे फुलांनी लगडून गेला आहे.

याच कामी येणाऱ्या करंजीची नवीन पानांची सळसळ वाढलीय. तर फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची विविध रंगी पालवी नेत्रसुखद वाटतेय. मका कणसाची सोनेरी व तांबूस केसरे सूर्यकिरणांत न्हाऊन निघाली, की त्याची चमकदार बनतायत. मक्याचा फुलोरा हवेच्या झोतामुळे परागी भवनामुळे कणसात टच्च दाणे भरतात. याच ऋतूमध्ये कडुनिंबाच्या झाडाच्या आधाराने वाढणाऱ्या गुळवेलाची लालबुंद फळांची माळ लक्षवेधक ठरतेय. मिरची, दोडका, काकडी, खरबुजाच्या फुलांवर मधमाश्‍यांचे गुंजन शेतकऱ्यांना फायदाच देत आहेत.

वेलवर्गीय पीक असो वा फळझाडे शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याच्या फुलांना अधिक महत्त्व असते. फळधारणेसाठी या विविध प्रकारच्या फुलांचा उपयोग होतो. त्यामुळे आम्हाला शेतात रोजच रंगपंचमी साजरी होताना दिसते. - संजय रितोंड, शेतकरी, रोपळे बुद्रुक, ता. पंढरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com