agriculture news in marathi, raosaheb danve communicate with farmers, nanded, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्नशील : रावसाहेब दानवे

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे व कापूस खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येतील. पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे व कापूस खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येतील. पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

खैरगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शनिवारी (ता. १६) या कुटुंबाचे सांत्वन करून श्री. दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. खैरगाव येथील शेतकरी आनंदा बालाजी कल्याणकर (वय ४५) यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. या शेतकरी कुटुंबाची दानवे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड, राजेश पवार, संतुक हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, उपसभापती डाॅ. लक्ष्मण इंगोले, अॅड. किशोर देशमुख, सुधाकर कदम, नीलेश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत देणे, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अटी शिथिल करणे आदी व्यथा मांडल्या.

या वेळी श्री. दानवे म्हणाले, की मराठवाड्यातील आठ व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तीन रुपये किलो दराने तांदूळ व दोन रुपये दराने गहू देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार जमा करण्यात येत आहेत. तिजोरीत पैसा वाढल्यावर रकमेत वाढ करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांशी पाठीशी आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसानीचा अंतिम आहवाल प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीसाठी दहा हजार कोंटीची तरतूद केली आहे. विम्यासाठी कृषी कार्यालयात तक्रारी कराव्यात, अशी माहिती श्री. दानवे यांनी दिली.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...