Agriculture news in Marathi Rapid decline in water supply in Saganli district | Page 2 ||| Agrowon

सागंली जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

वाढती उष्णता आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडील मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसत आहे.

सांगली : गेल्या वर्षी चांगले पाऊसमान झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे समाधानकारक भरले. त्यामुळे आतापर्यंत पाणीटंचाई भासली नाही. मात्र वाढती उष्णता आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडील मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या वीस दिवसांत १२ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला असून, पाणीटंचाईची चाहूल लागली असल्याने पाणी योजनांची आवर्तने महत्त्वाची ठरणार आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व भागात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. गेल्या वर्षी अपेक्षित झाला. त्यामुळे अनेक ठिकाणेच तलाव पाण्याने फुल्ल झाले होते. त्यातच योजना सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील तलाव भरून दिले होते. त्यात परतीचा चांगला पाऊस झाला. त्यामुळे काही तलाव भरलेले आहेत, तर काही तलावात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील चार तलावांतील पाणीसाठा मृतसंचयाखाली गेला आहे. तर ३२ तलावांमध्ये २५ ते ५० टक्के इतका पाणीसाठा आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावात २५ टक्के जलसाठा आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू आहे. तर म्हैसाळ योजनेचे आवर्तन नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे या दोन्ही लाभ क्षेत्रातील गावांना याचा लाभ मिळणार आहे. परंतु टेंभूच्या पाण्याची प्रतीक्षा असणार आहे.

या वर्षी विशेष म्हणजे दरवर्षी सर्वाधिक टंचाई भासणाऱ्या जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यात समाधानकारक जलसाठे आहेत. आटपाडी तालुक्यात ६८ टक्के पाणीसाठा आहेत. तर कवठेमहांकाळ तालुक्यातही ६४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र जत तालुक्याच्या पूर्व भागात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी ५९ टक्के पाणीसाठा होता. तर अवघ्या पंधरा दिवसांत १४ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...