नगर जिल्ह्यात टॅंकरमध्ये झपाट्याने वाढ

नगर जिल्ह्यात टॅंकरमध्ये झपाट्याने वाढ
नगर जिल्ह्यात टॅंकरमध्ये झपाट्याने वाढ

नगर : जिल्ह्यातील २४१ गावे आणि १२३० वाड्या-वस्त्यांतील पाच लाख ५७ हजार ९६९ लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ३०२ टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने गावशिवारात मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्यामुळे टॅंकरची मागणी वाढत आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वरचेवर गंभीर होत आहे. पाणी साठवण झालेले नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतीला तर पाणी मिळेनासे झाले आहे. पण पिण्याच्या पाण्याचे स्रोतही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पाथर्डी, राहुरी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे, शेवगाव, कर्जत, जामखेड, नगर आणि कोपरगाव या दहा तालुक्‍यांत जिल्हा प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या वरचेवर वाढत आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेला. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील २४६ गावांमधील जलस्तर तीन मीटरने घटला आहे. जिल्ह्यात अधिकृत नोंदणी असलेल्या विहिरींची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यांपैकी ९० टक्के विहिरींनी आता तळ गाठला आहे. 

त्यामुळे टंचाईग्रस्त शिवारात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टॅंकर सुरू करण्यात आले. जिल्ह्यात सर्वांत जास्त टॅंकर पाथर्डीत ११२, तर सर्वांत कमी राहुरी तालुक्‍यात एक टॅंकर सुरू आहे. शासकीय २२, तर खासगी २८०, असे एकूण ३०२ टॅंकर सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com