Agriculture news in Marathi Rapid increase in water storage of projects in Marathwada | Page 5 ||| Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये अलीकडे झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पाणीसाठा वाढतो आहे. शिवाय कोरड्या प्रकल्पांचीही संख्या घटत असून, सर्व प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ४३ टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये अलीकडे झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पाणीसाठा वाढतो आहे. शिवाय कोरड्या प्रकल्पांचीही संख्या घटत असून, सर्व प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ४३ टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. 

गत आठवड्याच्या तुलनेत प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा २३ जुलै अखेरपर्यंत जवळपास ६ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ४९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. पावसाचे तेवढे प्रमाण नसल्याने जायकवाडीत अजून आवक सुरू नाही. जायकवाडीत सद्यःस्थितीत ३६ टक्‍के उपयुक्‍त साठा आहे. 

हिंगोलीतील सिद्धेश्‍वर प्रकल्पांत ६९ टक्‍के, नांदेड यवतमाळच्या सीमेवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांत ६३ टक्‍के, येलदरीत ७० टक्‍के, निम्न मनारमध्ये ८२ टक्‍के, विष्णुपुरीत ७५ टक्‍के, निम्न दुधनामध्ये ८३ टक्‍के निम्न तेरणामध्ये ५७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पांत अजून अनुक्रमे ३० व २२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. तर सीनाकोळेगाव प्रकल्पात अजून उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत ६८ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ६१ टक्‍के, जालन्यातील ७ व बीडमधील १६ प्रकल्पांत प्रत्येकी ४० टक्‍के, औरंगाबादमधील १६ प्रकल्पांत २३ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत २१ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत १८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ७५३ लघू प्रकल्पांची अवस्था अजूनही चांगली सुधारली असे म्हणता येणार नाही. ७५३ लघू प्रकल्पांमध्ये २५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ लघू प्रकल्पांत केवळ ८ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. जालन्यातील ५७ प्रकल्पांत २७ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २२ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २५ टक्‍के, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पांत १७ टक्‍के, हिंगोलीतील २६ प्रकल्पांत ३१ टक्‍के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ५८ टक्‍के तर परभणीतील २२ मध्यम प्रकल्पांतील ५२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

३१ लघू प्रकल्प अजूनही कोरडे
मराठवाड्यातील ७५३ लघू प्रकल्पांपैकी अजूनही ३१ प्रकल्प कोरडेच आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ७, बीडमधील ८, लातूरमधील ९ व उस्मानाबादमधील ७ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे २२२ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील ४८, जालन्यातील २४, बीडमधील ४९, लातूरमधील २६, उस्मानाबादमधील ६५, नांदेडमधील ७, हिंगोलीतील २ व परभणीतील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन होणार :...सोलापूर ः मतदार यादीची चाळणी करण्यासाठी १६...
बोडणी जेटीच्या कामाला पुन्हा वेगअलिबाग : निधीअभावी रखडलेल्या अलिबाग तालुक्यातील...
वस्त्रोद्योग प्रकल्पांनी वीज सवलतीसाठी...सोलापूर ः २७ अश्‍वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले...
धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणूक...धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेची...
भाजपचा शेतकरी मोर्चा गुलाबरावांच्या...जळगाव : भाजपचा शेतकरीप्रश्‍नी सोमवारी (ता.१)...
जळगावातील श्रीराम रथोत्सवास सशर्त...जळगाव : शतकोत्तर परंपरा लाभलेला श्रीराम रथोत्सव...
साखर उद्योगासाठी नजीकचा काळ आव्हानात्मक...पुणे : कर्नाटकात पूर्वी गाळप हंगाम हा तब्बल नऊ...
शेतकऱ्यांना अखेर मिळाली पुरस्काराची...औरंगाबाद : कृषी विभागातील शेतकऱ्यांना पीक...
दादांचे बंधुप्रेम...मुख्यमंत्र्यांची...बारामती, जि. पुणे : ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापूर : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्‍शन...सोलापूर : अतिवृष्टीत वाचलेली पिके सध्या...
बारामतीत होतेय सायन्स अँड इनोव्हेशन ॲ...माळेगाव, जि. पुणे ः जागतिक पातळीवर विज्ञान आणि...
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...