नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक लागवडी सुरू

नाशिक : जिल्ह्यात चांदवड, देवळा, येवला व नांदगाव तालुक्यात तुरळक ठिकाणी कांदा लागवड सुरू झाल्या आहेत.
Rare cultivation of red onion started in Nashik district
Rare cultivation of red onion started in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा हंगाम तोंडावर आहे. त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी लागवडीची पूर्वतयारी म्हणून रोपवाटिका तयार केल्या आहेत. मात्र, चांदवड, देवळा, येवला व नांदगाव तालुक्यात तुरळक ठिकाणी कांदा लागवड सुरू झाल्या आहेत. रोपे लागवडीच्या दरम्यान खराब होत असल्याने अजूनही अपेक्षित लागवडीला गती आली नसल्याचे चित्र आहे.

प्रामुख्याने पोळ्याच्या अगोदरपासून या हंगामातील कांदा लागवड सुरू होतात. चालू वर्षी २० हजार ५८४ हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. त्यानुसार २७३३ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिकाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, रोपवाटिका व्यवस्थापन होत नसल्याने त्यांचे खराब होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याची स्थिती आहे.

सध्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवडींनी अपेक्षित वेग घेतलेला नाही. अनेक ठिकाणी रोपांची उपलब्धता, पावसाअभावी सिंचनाची सुविधा नसल्याने कामकाजात अस्थिरता आहे. जिल्ह्यात ७० टक्के टाकलेली रोपे बाधित होत आहेत. त्यामुळे लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. 

चालू वर्षी रोपे खराब होत असल्याने लागवडीचा वेग कमी आहे. मात्र १५ दिवसानंतर लागवडी जोमाने सुरू होतील.  - कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला. 

रोपांचे खुप नुकसान झाले. चार ते पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने कांदा लागवडीसाठी जमीन तयार होत नाही. त्यामुळे विलंब होत आहे. - अमोल गागरे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड

लाल पोळ कांद्याची रोपे ७५ टक्के खराब झाली आहेत. त्यामुळे लागवडीला मोठ्या प्रमाणात अडचण आली आहे. - रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक, सायगाव, ता. येवला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com