Agriculture news in marathi Rare cultivation of red onion started in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक लागवडी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

नाशिक : जिल्ह्यात चांदवड, देवळा, येवला व नांदगाव तालुक्यात तुरळक ठिकाणी कांदा लागवड सुरू झाल्या आहेत.

नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा हंगाम तोंडावर आहे. त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी लागवडीची पूर्वतयारी म्हणून रोपवाटिका तयार केल्या आहेत. मात्र, चांदवड, देवळा, येवला व नांदगाव तालुक्यात तुरळक ठिकाणी कांदा लागवड सुरू झाल्या आहेत. रोपे लागवडीच्या दरम्यान खराब होत असल्याने अजूनही अपेक्षित लागवडीला गती आली नसल्याचे चित्र आहे.

प्रामुख्याने पोळ्याच्या अगोदरपासून या हंगामातील कांदा लागवड सुरू होतात. चालू वर्षी २० हजार ५८४ हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. त्यानुसार २७३३ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिकाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, रोपवाटिका व्यवस्थापन होत नसल्याने त्यांचे खराब होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याची स्थिती आहे.

सध्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवडींनी अपेक्षित वेग घेतलेला नाही. अनेक ठिकाणी रोपांची उपलब्धता, पावसाअभावी सिंचनाची सुविधा नसल्याने कामकाजात अस्थिरता आहे. जिल्ह्यात ७० टक्के टाकलेली रोपे बाधित होत आहेत. त्यामुळे लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. 

चालू वर्षी रोपे खराब होत असल्याने लागवडीचा वेग कमी आहे. मात्र १५ दिवसानंतर लागवडी जोमाने सुरू होतील. 
- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला. 

रोपांचे खुप नुकसान झाले. चार ते पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने कांदा लागवडीसाठी जमीन तयार होत नाही. त्यामुळे विलंब होत आहे.
- अमोल गागरे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड

लाल पोळ कांद्याची रोपे ७५ टक्के खराब झाली आहेत. त्यामुळे लागवडीला मोठ्या प्रमाणात अडचण आली आहे.
- रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक, सायगाव, ता. येवला
 


इतर बातम्या
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...