agriculture news in marathi, Rashi and kaveri seed gets clean cheat form state Agri department | Agrowon

राशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन चिट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

नागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी लादलेल्या राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस या हंगामात परवानगी देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या चाचण्यांमध्ये हे वाण पास झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. एचटी सीड प्रकरणात कावेरी सीड्सला देखील क्‍लीन चिट देण्यात आली आहे. 

नागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी लादलेल्या राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस या हंगामात परवानगी देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या चाचण्यांमध्ये हे वाण पास झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. एचटी सीड प्रकरणात कावेरी सीड्सला देखील क्‍लीन चिट देण्यात आली आहे. 

कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३५ लाख रुपयांचा भरणा करण्याचे आदेश राशी कंपनीला देण्यात आले होते. परंतु, रकम भरपाईस टाळाटाळ होत होती. त्याची दखल घेत शासनाकडून संबंधित कंपनीच्या राशी ६५९ या वाणाचे नमुने घेत त्याच्या प्रक्षेत्र चाचण्यांचे आदेश देण्यात आले. कृषी विद्यापीठस्तरावर या ट्रायल घेण्यास सांगण्यात आले होते. चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत या वाण विक्रीस बंदी घालण्यात आली होती. 

गेल्या हंगामात घडलेल्या घडामोडीमुळे कंपनीला चांगला फटका बसला. कृषी विद्यापीठस्तरावरील चाचण्यांचे अहवालदेखील सकारात्मक आल्याने येत्या हंगामात राशी ६५९ या वाणाच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
नागपूर जिल्ह्यात 'जादू' आणि 'एटीएम' असा पाकिटावर उल्लेख असलेले बियाणे पकडण्यात आले होते. चाचणीत हे बियाणे एचटी (हर्बीसाईड टॉलरंट) असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कावेरी सिडसचे जादू आणि एटीएम हे वाण सशंयाच्या भोवऱ्यात सापडले होते. परंतु, कृषी विभागाच्या पडताळणीत पकडण्यात आलेल्या एचटी सिडसचा या कंपनीशी काही संबंध नसल्याचा खुलासा झाला. त्यामुळे कावेरी सिडसला देखील कृषी विभागाने क्‍लीन चिट दिली आहे.

  राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस येत्या हंगामात परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच नागपूर येथील कारवाईत पकडलेल्या जादू आणि एटीएम या एचटी बियाण्यांचा कावेरी सीडस कंपनीसोबत काही संबंध नसल्याचे समोर आले आहे.
- एम. एस. घोलप,
संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्‍तालय, पुणे

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...