Agriculture news in marathi, Rashmi Bagal joins Shiv Sena | Agrowon

रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड सुरूच आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर करमाळा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच नव्हे, तर पवार निष्ठावंत असणाऱ्या बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी बुधवारी (ता. २१) शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात, या प्रवेशामुळे करमाळ्यासह माढा मतदारसंघातील आगामी राजकारणावर त्याचे दुरगामी परिणाम होतील. 

सोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड सुरूच आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर करमाळा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच नव्हे, तर पवार निष्ठावंत असणाऱ्या बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी बुधवारी (ता. २१) शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात, या प्रवेशामुळे करमाळ्यासह माढा मतदारसंघातील आगामी राजकारणावर त्याचे दुरगामी परिणाम होतील. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत सौ. बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करून भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी त्यांच्या समवेत मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि बंधू दिग्विजय बागल, विलास घुमरे आदींनीही हाती शिवबंधन बांधले. रश्‍मी बागल या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रांतिक सदस्या आहेत. माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या मातोश्री शामल बागल याही पूर्वी आमदार होत्या. २०१४ मध्ये स्वतः रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवसेनेचे नारायण पाटील यांनी अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव केला. आता त्या स्वतःच शिवसेनेत आल्याने आमदार पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तत्कालीन विधानसभा निवडणुकीत पाटील यांच्याबरोबर भाजपचे सहयोगी सदस्य असलेले संजय शिंदे हेही बागल यांचे विधानसभेतील प्रतिस्पर्धी उमेदवार होते. माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली, त्यामुळे बागल गट काहीसा नाराज होता. पण विधानसभेसाठी करमाळ्यात बागल यांना सहकार्य करण्याच्या शिंदे यांच्या भूमिकेमुळे बागल यांनी लोकसभेसाठी शिंदे यांची इच्छा नसताना प्रचार केला. पण आता लोकसभेत पराभव झाल्यानंतर शिंदे हे पुन्हा करमाळा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्याबाबत काहीच स्पष्टता मिळत नसल्याने रश्‍मी बागल यांनी थेट नाराजी व्यक्त करून शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत निर्णय घेतला.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...