कांदा दरप्रश्नी राष्ट्रवादीचा रास्ता रोको

राष्ट्रवादी आंदोलन
राष्ट्रवादी आंदोलन

नाशिक: दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन घटके आहे. कांद्याला हमीभाव द्यावा, द्राक्ष पिकाचा विम्यात समावेश करावा, सरसकट कर्जमाफी, वीजबील माफ करावे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे विंचूर येथील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  पक्षाचे पदाधिकारी रस्त्यावर जमले होते. त्यांनी रस्त्यावर कांदे फेकुन सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शेतीमालाला बाजारभाव नसल्याने कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांदा पिकाला भाव नाही. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, कांद्याला हमीभाव द्यावा यांसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. कांद्याला ५० ते १०० रुपये एवढी कवडीमोल किंमत मिळत असून त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. सरकारने त्वरित शेतीमालाला हमीभाव द्यावा व संपूर्ण कर्जमाफी करून शेतकर्याचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी या रस्ता रोकोत करण्यात आली.  दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी हतबल झाला असून, खोटी आश्वासने देऊन गेली. मात्र सरकारने कांदा उत्पादकांना रडवले आहे. त्यामुळे सरकारने कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी आंदोलकानी केली. या वेळी माजी आमदार धनराज महाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय बनकर यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com