वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ

यंदा बेदाणानिर्मितीसाठी पोषक असे वातावरण सुरुवातीपासून मिळाले नाही. त्याचा फटका बेदाणा तयार होण्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे दर्जेदार बेदाणानिर्मिती होत नसल्याने मोठे संकट आले आहे. - सुनील माळी, बेदाणा उत्पादक शेतकरी आणि शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ
rasin
rasin

सांगली ः द्राक्ष बागायतदारांवर निसर्गाच्या संकटाचे सत्र सुरूच राहिले आहे. आता ढगाळ हवामान आणि थंडीमुळे आर्द्रतेचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होऊ लागला आहे. यामुळे बेदाणा काळा पडत असून, दर्जेदार तयार होत नाही. या अनोख्या अस्मानी संकटामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. यंदाच्या हंगामात सततच्या पावसाने निकृष्ट प्रतीची द्राक्षे उत्पादित होऊ लागली आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक संकटे आली. त्यातून त्यांनी मार्ग काढत दर्जेदार द्राक्ष तयार केली. मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षाला बसला आहे. त्यामुळे दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बेदाण्याचा सुरू होणारा हंगाम यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी द्राक्षांपासून बेदाणानिर्मितीचा पर्याय निवडला आहे.  जिल्ह्यातील बेदाणानिर्मितीच्या ठिकाणी वातावरण कोरडे असल्याने इथला बेदाणा दर्जेदार तयार होतो. मात्र, सध्या हंगामाच्या सुरुवातीलाच बेदाणा उत्पादकांत धास्ती निर्माण झाली आहे. सातत्याने ढगाळ हवामान व वाढत्या धुक्यामुळे शेडवरील बेदाणा ओलसर होत आहे. त्यामुळे बेदाण्याची प्रतवारी कमी होऊ लागली असून, बेदाणा काळसर पडू आहे. तयार होणारा बेदाणा काळा पडून निकृष्ट प्रतीचा होणार आहे. परिणामी त्याला बाजारात दर मिळणार नाही. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. खराब वातावणामुळे मिरज-पंढरपूर महामार्गालगत शेळकेवाडी ते जुनोनी पट्ट्यात, चोरोचीसह भागात सुरू असलेल्या बेदाणा शेडवर असा निकृष्ट बेदाणा सर्रास दिसू लागला आहे. द्राक्षांची ही अवस्था झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com