कापूस खरेदी केंद्रासाठी मानोऱ्यात ‘रास्ता रोको’

वाशीम ः कापूस उत्पादनात तालुका अग्रेसर असताना या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी मानोरा येते दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 'Rasta Roko' in Manor for cotton shopping center

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. कारंजा किंवा मंगरूळपीर तालुक्यातील केंद्रावर कापूस विक्रीला न्यावा लागत आहे. मानोरा तालुक्यात सुमारे १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती.  शेतकऱ्यांकडून वारंवार मानोरा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. परंतु ही मागणी दुर्लक्षित ठेवण्यात आली.  

संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यात महंत संजय महाराज, नामा बंजारा, महंत रमेश महाराज, शिवसंग्रामचे किशोर राठोड, प्रा. जय चव्हाण, गजानन पवार, धर्मा आडे आदी सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com