ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत रास्तारोको

वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांमुळे जिल्ह्यातील ऊसतोडणी रखडली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तळेरे-कोल्हापूर महामार्ग वैभववाडीत दीड तास तर खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्ग उबंर्डे येथे चार तास रोखून धरला.
Rastaroko in Vaibhavwadi, Umbarde due to deforestation
Rastaroko in Vaibhavwadi, Umbarde due to deforestation

सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांमुळे जिल्ह्यातील ऊसतोडणी रखडली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तळेरे-कोल्हापूर महामार्ग वैभववाडीत दीड तास तर खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्ग उबंर्डे येथे चार तास रोखून धरला. 

संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरतानाच त्यांच्या कारभाराचे अक्षरक्षः वाभाडे काढले. दरम्यान २८ जानेवारीपासून करूळ घाटरस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल आणि भुईबावडा घाटरस्त्याने देखील वाहतूक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

जिल्ह्यातील ऊसतोडणी रखडली आहे. १ लाख टन उसापैकी अवघ्या पाच ते सहा हजार टन उसाची तोडणी झाली आहे. उर्वरित उसाची तोडणी न झाल्यास मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा भाजप किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता. २४) तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वैभववाडी येथे रस्ता रोखण्यात आला. तर खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे येथे देखील त्याचवेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यानी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.  

महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दोन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे जमा झाला. भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरुवात केली. 

आंदोलन सुरू झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता आत्माराम ओटवणेकर तेथे आले. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप कार्यकर्त्यानी पहिले काम सुरू करा आणि मगच चर्चेला या असे प्रतिउत्तर दिले. घाटात काम सुरू व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com