परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटल

परभणीः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२३) रताळ्यांची ५०० क्विंटल आवक होती. त्यांना प्रतिक्विंटल कमाल १२०० ते किमान १५००, तर सरासरी १३५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 Ratali in Parbhani is Rs. 1350 per quintal
Ratali in Parbhani is Rs. 1350 per quintal

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२३) रताळ्यांची ५०० क्विंटल आवक होती. त्यांना प्रतिक्विंटल कमाल १२०० ते किमान १५००, तर सरासरी १३५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवारीची १५ क्विंटल आवक होऊन ३००० ते ६०००, सरासरी ४५०० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक, तर ४००० ते ६०००, सरासरी ५००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ४ क्विंटल आवक होऊन ४००० ते ७०००, सरासरी ५५०० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन १५०० ते २५००, सरासरी २००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन १५०० ते २५००, सरासरी २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रुपये, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले. मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते १००० तर सरासरी ७५० रुपये दर मिळाले. 

कोथिंबिरीची १७५ क्विंटल आवक होऊन २००० ते ५००० सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन ४००० ते ७०००, तर सरासरी ५५०० रुपये  दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक होऊन ४००० ते ५०००, सरासरी ४५०० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक होऊन १५०० ते २५०० रुपये, तर सरासरी २००० रुपये मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५००, सरासरी २००० रुपये मिळाले. वांग्यांची १५ क्विंटल आवक होऊन ४००० ते ७०००, सरासरी ५५०० रुपये दर मिळाले. 

टोमॅटोची १८०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४०० ते ७००, सरासरी ५५० रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक होऊन ३००० ते ५०००, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन ४००० ते ५०००, सरासरी ४५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन २००० ते ३५००, सरासरी २७५० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्यांची ७ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रुपये, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.

पपई ८०० रूपये क्विंटल

लिंबांची २५ क्विंटल आवक होऊन ७०० ते १५००, सरासरी ११०० रुपये दर मिळाले. मक्याची ७० क्विंटल आवक होऊन ८०० ते १३००, सरासरी १०५० रुपये दर मिळाले. आवळ्यांची १० क्विंटल आवक होऊन १००० ते कमाल १५००, सरासरी १२५० रुपये दर मिळाले. पपईची २० क्विंटल आवक होऊन ६०० ते १०००, सरासरी ८०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com