agriculture news in Marathi rate of banana constant Maharashtra | Agrowon

केळीची मागणी कायम, दर टिकून 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले. 

जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले. या महिन्यात सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

दर्जेदार केळीला ऑन (जादा) दरही खरेदीदारांनी दिले होते. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. सध्या उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा भागात सुरू आहे. केळीचे आगार असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, यावल भागांत आगाप लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू झालेली नाही. अपवादाने या भागात काढणी सुरू आहे. यातच यंदा जळगाव, चोपडा भागांत कांदेबाग केळीची काढणी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. गुजरातमधून केळीचा पुरवठा फारसा उत्तर भारतात सुरू नाही. 

गुजरातमधील केळी उत्तरेकडील खरेदीदारांना परवडते. रस्त्यांचे जाळे व इतर बाबींमुळे वाहतूक खर्चही उत्तरेकडील खरेदीदारांना गुजरातची केळी मागविताना कमी पडतो. परंतु गुजरातमधील केळीची काढणी जुलैमध्येच संपली आहे. गुजरातमधील केळीची आवक डिसेंबरमध्ये सुरू होईल. तसेच सध्या दाक्षिणात्य भागातील आंध्र प्रदेशातूनही केळीचा फारसा पुरवठा उत्तरेकडे सुरू नाही. यामुळे केळीचे दर खानदेशात टिकून राहिले. अनेकदा नोव्हेंबरमध्ये केळीचे दर घसरत होते. परंतु यंदा दर घसरलेले नाहीत. किंवा काढणीसंबंधीदेखील शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.

केळी काढणीत घट
दिल्ली, काश्‍मीर, पंजाब, उत्तर प्रदेशातील खरेदीदार एजंटच्या माध्यमातून रस्तेमार्गे केळीचा पुरवठा करून घेत आहेत. सध्या जळगाव, चोपडा, पाचोरा, यावल भागात कांदेबाग केळीची काढणी कमी झाली आहे. डिसेंबरच्या मध्यानंतर काढणी आणखी कमी होईल. सध्या प्रतिदिन १७० ते १७५ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. यामुळे तेथेही केळीचा पुरवठा कमी झाल्याची माहिती मिळाली. सध्या केळीला किमान ६५० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....