मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
केळीची मागणी कायम, दर टिकून
दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले.
जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर भारतातील आवक कमीच आहे. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव कायम असून, यंदा नोव्हेंबरमध्ये प्रथमच दर टिकून राहिले. या महिन्यात सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.
दर्जेदार केळीला ऑन (जादा) दरही खरेदीदारांनी दिले होते. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. सध्या उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा भागात सुरू आहे. केळीचे आगार असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, यावल भागांत आगाप लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू झालेली नाही. अपवादाने या भागात काढणी सुरू आहे. यातच यंदा जळगाव, चोपडा भागांत कांदेबाग केळीची काढणी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. गुजरातमधून केळीचा पुरवठा फारसा उत्तर भारतात सुरू नाही.
गुजरातमधील केळी उत्तरेकडील खरेदीदारांना परवडते. रस्त्यांचे जाळे व इतर बाबींमुळे वाहतूक खर्चही उत्तरेकडील खरेदीदारांना गुजरातची केळी मागविताना कमी पडतो. परंतु गुजरातमधील केळीची काढणी जुलैमध्येच संपली आहे. गुजरातमधील केळीची आवक डिसेंबरमध्ये सुरू होईल. तसेच सध्या दाक्षिणात्य भागातील आंध्र प्रदेशातूनही केळीचा फारसा पुरवठा उत्तरेकडे सुरू नाही. यामुळे केळीचे दर खानदेशात टिकून राहिले. अनेकदा नोव्हेंबरमध्ये केळीचे दर घसरत होते. परंतु यंदा दर घसरलेले नाहीत. किंवा काढणीसंबंधीदेखील शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.
केळी काढणीत घट
दिल्ली, काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेशातील खरेदीदार एजंटच्या माध्यमातून रस्तेमार्गे केळीचा पुरवठा करून घेत आहेत. सध्या जळगाव, चोपडा, पाचोरा, यावल भागात कांदेबाग केळीची काढणी कमी झाली आहे. डिसेंबरच्या मध्यानंतर काढणी आणखी कमी होईल. सध्या प्रतिदिन १७० ते १७५ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. यामुळे तेथेही केळीचा पुरवठा कमी झाल्याची माहिती मिळाली. सध्या केळीला किमान ६५० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
- 1 of 1504
- ››