कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवर
जळगाव ः खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर स्थिर असून, दरात वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
जळगाव ः खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर स्थिर असून, दरात वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
देशी हरभऱ्याच्या तुलनेत आकाराने मोठा, रंगाने बासुंदी असलेला काबुली हरभरा खानदेशातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नफा देवून जातो. परंतु गेले तीन वर्षे दर कमी मिळाले आहेत. कारण गेल्या वर्षी लॉकडाऊनचा फटका बसला. त्यापूर्वी पेरणी अधिक झाल्याने दर कमी राहिले.
गेल्या वर्षी सरासरी साडेसहा हजार रुपये दर मिळाला होता. यंदा दर किमान आठ हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. जळगावमधील चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर या बाजार समित्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत.
यंदा खानदेशात सुमारे सात हजार हेक्टरवर काबुली हरभरा पीक होते. त्याची मळणी गेल्या आठवड्यातच सुरू झाली. पण सुरवातीला अपेक्षित दर मिळत नसल्याने काही शेतकरी घरात साठा करून ठेवत आहेत. शासकीय खरेदीत काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर जाहीर केलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना या हरभऱ्याची विक्री बाजारातच करावी लागेल.
एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन
या हरभऱ्याची पेरणी जळगावमधील चोपडा, रावेर, यावल, जळगाव यासह धुळ्यातील शिरपूर भागात अधिक झाली होती. चोपडा तालुक्यात या हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन शेतकरी घेतात.
यंदा एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन येत आहे. सध्या चोपडा, अमळनेर, शिरपूर येथील बाजारात आवक सुरू आहे. या बाजारांमध्ये मिळून प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल आवक होत आहे. आवक गेल्या वर्षाच्या तुलनेत ३०० क्विंटलने कमी आहे. परंतु, आवक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला.
- 1 of 1098
- ››