agriculture news in Marathi, rate down even milk shortage, Maharashtra | Agrowon

दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून भुकटी व बटरचे दरदेखील वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या दुग्धविकास आयुक्तालयाने घेतली आहे. 

शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघांकडून कमी दर दिला जात होता. त्यासाठी अनुदान योजना सुरू केली गेली. अनुदान सुरू करण्यापूर्वी असलेल्या समस्या आता दूध उद्योगासमोर नाहीत. बाजारपेठेत प्रक्रिया पदार्थांचे भाव वाढले, अतिरिक्त दूधदेखील घटले आहे. त्यामुळे आता भाव वाढवून न दिल्यास ती शेतकऱ्यांची लूट ठरेल, असा दावा दुग्धविकास खात्याच्या सूत्रांनी केला आहे. 

पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून भुकटी व बटरचे दरदेखील वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या दुग्धविकास आयुक्तालयाने घेतली आहे. 

शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघांकडून कमी दर दिला जात होता. त्यासाठी अनुदान योजना सुरू केली गेली. अनुदान सुरू करण्यापूर्वी असलेल्या समस्या आता दूध उद्योगासमोर नाहीत. बाजारपेठेत प्रक्रिया पदार्थांचे भाव वाढले, अतिरिक्त दूधदेखील घटले आहे. त्यामुळे आता भाव वाढवून न दिल्यास ती शेतकऱ्यांची लूट ठरेल, असा दावा दुग्धविकास खात्याच्या सूत्रांनी केला आहे. 

“दूध संघांना सरकारने गेल्या एक ऑगस्ट २०१८ पासून तीन महिने प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान वाटले. त्यानंतर पुन्हा पाच रुपये अनुदानाला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. पण, स्थिती सुधारल्याने ही रक्कम तीन रुपये केली गेली. तसेच, ही योजना ३० एप्रिल २०१९ पर्यंत होती. आता दुधाचा कृशकाळ सुरू होऊन तसेच भुकटी, बटरला दरवाढ मिळूनदेखील संघांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे,’’ असे दुग्धविकास खात्याचे म्हणणे आहे.

दुग्धविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे गेल्या आठवडयात खासगी व सहकारी दूध प्रकल्पधारकांची बैठक झाली असता शेतकऱ्यांना चांगले दर देण्याचे मान्य केले होते. “आम्हाला अनुदान या पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही, अशी भूमिका प्रकल्पधारकांनी या बैठकीत घेतली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दर वाढवून देणे ही नैतिक जबाबदारी आहे,” असे दुग्धविकास विभागाचे म्हणणे आहे.

एक मे २०१९ पासून राज्यातील शेतकऱ्यांना सर्व दूध प्रकल्पधारकांनी प्रतिलिटर २५ रुपयांप्रमाणे दर देण्याची आवश्यकता असल्याचे दुग्धविकास आयुक्तालयाने सूचित केले आहे. “शेतकऱ्यांना किमान २५ रुपये दर मिळवून देण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी, प्रादेशिक उपनिंबधक व सहायक निबंधकांनी दूध प्रकल्पधारकांना सूचना करावी,’’ असे आदेश दुग्धविकास आयुक्तांनी काढले आहेत. 

पोकळ आदेशांना महत्त्व नाही
दूध उद्योगाने मात्र दुग्धविकास खात्याच्या आदेशाला फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. “दुग्धविकास खात्याच्या पोकळ आदेशांना आता महत्त्व राहिलेले नाही. बाजारपेठेतील स्थिती पाहून, तसेच स्वतःचा नफा सांभाळूनच दुधाला दर देण्याची पद्धत आता घट्ट रुजली आहे. त्यामुळे अमुक एक दर देण्याची सक्ती करण्याचे दिवस आता गेले आहेत. सध्या २३ रुपयांच्या वर भाव देता येणार नाही,” अशी भूमिका एका खासगी दूध प्रकल्पधारकाने व्यक्त केली.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...