निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरण

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मंगळवारी(ता.१६)जिल्ह्यात कांद्याचे सरासरी दर ५०० रुपयांनी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
Onion
Onion

नाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मंगळवारी(ता.१६)जिल्ह्यात कांद्याचे सरासरी दर ५०० रुपयांनी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.  कांद्याची सड होऊ लागल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती. निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाच्या खाली म्हणजेच कमाल ७०० रुपयांपर्यंत विकला गेला. मात्र अगदी १५ ते २० टक्के कांदा शिल्लक असल्याने व त्याची टिकवणक्षमता घटू लागल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होऊ लागली. मात्र अशातच केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दरात मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दरात पुन्हा घसरण झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.  जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडे साठवलेला कांदा संपला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात कांदा विक्री सुरू आहे. त्यात दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे अगोदर क्विंटलला एक हजाराने भाव गडगडले होते. त्यातच होणारी ही दरातील घसरण शेतकऱ्यांचा रोष वाढवणारी आहे. 

बाजार समितीनिहाय सरासरी दरातील तफावत

बाजार समिती १४ सप्टेंबर १६ सप्टेंबर तफावत
लासलगाव २८०१ २४७० ३३१  
पिंपळगाव बसवंत २६५१ २४५१ २००
नामपूर २७५० २४५० ३००
कळवण २९०० २४०० ५००
उमराने २६००. २४०० २००
मनमाड २९०० २४०० ५००
देवळा २८०० २३०० ५००

प्रतिक्रिया आधीच शेतकऱ्यांचा कांदा पावसामुळे सडला. लॉकडाउन काळात तसाच पडून राहिला. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंबीर खुपसला आहे. सिमांवर आणि बंदरावर असे जवळपास ४०० कंटेनर कांदा पडून आहे. निर्यात बंदीतून शेतकरी संपूर्ण बरबाद करण्याचे धोरण आहे. -हंसराज वडघुले,  अध्यक्ष-संघर्ष शेतकरी संघटना 

मनमानी करून सरकारने निर्यातबंदी केल्याने दरात घसरण झाली. अगोदरच उत्पादन खर्च वाढला. त्यात सड होऊन नुकसान झाले. लागवड खर्च व उत्पन्न यात तफावत आहे. सरकारने घाई करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले. - संदीप कोकाटे, कांदा उत्पादक शेतकरी, साताळी, ता.येवला गेल्या सहा महिन्यात ४ ते ५ रुपये दर होता. त्यावेळी आमची दखल घेतली नव्हती. आता ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ असल्याचे समोर आले आहे. -हरिसिंग ठोके, कांदा उत्पादक, सांगवी, ता. देवळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com