agriculture news in Marathi rate down of onion due to export ban Maharashtra | Agrowon

निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मंगळवारी(ता.१६)जिल्ह्यात कांद्याचे सरासरी दर ५०० रुपयांनी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

नाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मंगळवारी(ता.१६)जिल्ह्यात कांद्याचे सरासरी दर ५०० रुपयांनी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. 

कांद्याची सड होऊ लागल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती. निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाच्या खाली म्हणजेच कमाल ७०० रुपयांपर्यंत विकला गेला. मात्र अगदी १५ ते २० टक्के कांदा शिल्लक असल्याने व त्याची टिकवणक्षमता घटू लागल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होऊ लागली. मात्र अशातच केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दरात मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दरात पुन्हा घसरण झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. 

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडे साठवलेला कांदा संपला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात कांदा विक्री सुरू आहे. त्यात दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे अगोदर क्विंटलला एक हजाराने भाव गडगडले होते. त्यातच होणारी ही दरातील घसरण शेतकऱ्यांचा रोष वाढवणारी आहे. 

बाजार समितीनिहाय सरासरी दरातील तफावत

बाजार समिती १४ सप्टेंबर १६ सप्टेंबर तफावत
लासलगाव २८०१ २४७० ३३१
 
पिंपळगाव बसवंत २६५१ २४५१ २००
नामपूर २७५० २४५० ३००
कळवण २९०० २४०० ५००
उमराने २६००. २४०० २००
मनमाड २९०० २४०० ५००
देवळा २८०० २३०० ५००

प्रतिक्रिया
आधीच शेतकऱ्यांचा कांदा पावसामुळे सडला. लॉकडाउन काळात तसाच पडून राहिला. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंबीर खुपसला आहे. सिमांवर आणि बंदरावर असे जवळपास ४०० कंटेनर कांदा पडून आहे. निर्यात बंदीतून शेतकरी संपूर्ण बरबाद करण्याचे धोरण आहे.
-हंसराज वडघुले, अध्यक्ष-संघर्ष शेतकरी संघटना 

मनमानी करून सरकारने निर्यातबंदी केल्याने दरात घसरण झाली. अगोदरच उत्पादन खर्च वाढला. त्यात सड होऊन नुकसान झाले. लागवड खर्च व उत्पन्न यात तफावत आहे. सरकारने घाई करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले.
- संदीप कोकाटे, कांदा उत्पादक शेतकरी, साताळी, ता.येवला

गेल्या सहा महिन्यात ४ ते ५ रुपये दर होता. त्यावेळी आमची दखल घेतली नव्हती. आता ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ असल्याचे समोर आले आहे.
-हरिसिंग ठोके, कांदा उत्पादक, सांगवी, ता. देवळा


इतर बातम्या
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...