agriculture news in Marathi rate of fodder increased by 40 percent Maharashtra | Agrowon

पशुखाद्य दर गगणाला भिडले

अभिजित डाके
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा पशुखाद्याच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे खाद्याची मागणीही ५० टक्क्यांनी घटली आहे. कच्च्यामालाची उपलब्धता झाल्यावर दर कमी होतील असा अंदाज आहे.
- रावसाहेब लठ्ठे, पशुखाद्य उत्पादक

सांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य उद्योगाला बसला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने वर्षभरात पशुखाद्याच्या दरात तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या मागणीतही ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

शेतकऱ्यांनी शेतीच्या जोडीला दुग्धव्यवसाय सुरू केला. शेतकऱ्यांचा हाच मुख्य व्यवसाय बनला. जातिवंत दुधाळ जनावरे खरेदी करून, या व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून दिले. निवारा शेड, त्याचबरोबर मुक्त गोठा पद्धती, मिल्क मशीन, कडबा कुट्टी मशीन अशा अनेक सुविधांसाठी मोठी गुंतवणूक शेतकऱ्यांनी या व्यवसायात केली आहे. दुग्धव्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता आली.

मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यात पडलेला दुष्काळ आणि यंदा झालेला पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातून पिकांचे उत्पादनही मिळाले नाही. याचा फटका पशुखाद्यनिर्मितीस लागणाऱ्या कच्चा मालावर झाला. परिमाणी, कच्चा मालांच्या दरात वाढ झाली. कच्च्या मालाच्या दरात सातत्याने चढ- उतार होत आहेत. यामुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी आणि पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

दुष्काळ पुराचा परिणाम 
दुष्काळामुळे पिके पाण्याविना वाळून गेली. त्यातच महापुरामुळे पिके पाण्याने कुजून गेली. परिणामी, जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला नाही. त्यातच पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने जनावरे सांभाळण्याचा खर्चात वाढल्याने पशुपालकांनी जनावरे विक्री करू लागली आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या मागणीतही पन्नास टक्के घट झाली आहे.

दर कमी होण्याची शक्यता
सध्या बाजारात शेतीमालाची आवक येऊ लागली आहे. परंतु, ही आवक खाद्यनिर्मितीसाठी पुरेशी नाही. येत्या पहिल्या दोन महिन्यांत पुरेशा कच्च्या मालाची आवक होईल. त्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दर असेच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया
महापुरानंतर जनावरे सांभाळणे मुश्कील झाले. त्यातच पशुखाद्याचे दर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोणत्याही संघाने दूध दर वाढ केली नाही. त्यामुळे दावणीला १७ जनावरे होती. खर्च वाढला असल्याने ६ जनावरांची विक्री केली.
- प्रीतम पाटील, दुधगाव, ता. मिरज.

 


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...