Agriculture news in marathi, The rate of pomegranate shrimp in Solapur | Agrowon

सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळी

सुदर्शन सुतार
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या आवकेत काहीशी घट झाली. तरी मागणी असल्याने डाळिंबाच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. डाळिंबाचा प्रतिक्विंटलचा दर सर्वाधिक १४ हजार रुपयांवर पोचला आहे. साधारण, प्रतिकिलोला सर्वाधिक १४० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या आवकेत काहीशी घट झाली. तरी मागणी असल्याने डाळिंबाच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. डाळिंबाचा प्रतिक्विंटलचा दर सर्वाधिक १४ हजार रुपयांवर पोचला आहे. साधारण, प्रतिकिलोला सर्वाधिक १४० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक रोज ५०० क्विंटल ते दीड टनापर्यंत राहिली. डाळिंबाची सर्व आवक सांगोला, मंगळवेढा, माढा भागांतून झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच होती. पण मागणी होती, शिवाय त्यात सातत्य होते. परिणामी, डाळिंबाच्या दरात तेजी राहिली. गेल्या दोन आठवड्यांपासून डाळिंबाच्या दरातील तेजी आहे. या सप्ताहात डाळिंबाच्या दराने मात्र चांगलीच उसळी घेतली.

डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ५००० रुपये, तर सर्वाधिक १४ हजार रुपये दर मिळाला. अर्थात, प्रतिकिलोला ५० रुपये ते १४० रुपये असा दर मिळाला. 
सध्या पूरपरिस्थिती आणि पाण्याच्या टंचाईमुळे डाळिंबाची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. शिवाय गुणवत्ताही नाही. त्यामुळे चांगल्या डाळिंबाला हा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, कोबी, ढोबळी मिरची, गवार, भेंडी यांच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा टिकून होती.

वांग्याची आवक रोज २० ते ३० क्विंटल, कोबीची ८ ते १० क्विंटल, ढोबळी मिरचीची २० ते ४० क्विंटल आणि गवार, भेंडीची प्रत्येकी ६ ते १० क्विंटलपर्यंत आवक राहिली. या फळभाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातून झाली. 

वांग्याला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये, कोबीला किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये, ढोबळी मिरचीला ११०० ते २००० रुपये, गवारला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर मिळाला.

भाज्यांचे दर मात्र पुन्हा स्थिर राहिले. भाज्यांची आवक मात्र तशीच आठ ते दहा हजार पेंढ्या रोज अशी कायम राहिली. भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. मेथीला शंभर पेंढ्यासाठी ६०० ते १००० रुपये, शेपूला २०० ते ४०० रुपये आणि कोथिंबिरीला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...