शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
अॅग्रोमनी
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात वाढ
बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या पॅकिंगसाठीचे कोरोगेटेड बॉक्सच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी प्रति बॉक्सचा २२ ते २७ रुपये दर होता.
सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या पॅकिंगसाठीचे कोरोगेटेड बॉक्सच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी प्रति बॉक्सचा २२ ते २७ रुपये दर होता. यंदा हाच दर १० ते १२ रुपयांनी वाढून ३२ ते ३७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात अजून दरात वाढीची शक्यता आहे. त्यामुळे बेदाणा पॅकिंगच्या खर्चात वाढ होणार असल्याने अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे.
बॉक्स तयार करण्यासाठी युरोपातून इंपोर्टेड वेस्ट आयात केले जाते. या वेस्टच्या माध्यमातून बॉक्स तयार केले जातात. गेल्या वर्षी इंपोर्टेड वेस्टचा दर प्रति किलोस २० रुपये इतका होता. अगदी गेल्या तीन महिन्यांपर्यंत दर २२ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे बॉक्सच्या दरात किंचित वाढ झाली होती. युरोपमधून इंपोर्टेड वेस्ट चीन जादा दराने खरेदी करत असल्याने भारतात आयात थांबली आहे. त्यामुळे दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात बॉक्स तयार करणारे ४० हून अधिक कारखाने आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यात बेदाणा तयार होतो. त्यामुळे बेदाणा पॅकिंगसाठी कोरेगेटेड बॉक्सचा मोठा वापर केला जातो. सध्या बॉक्सला मागणी नाही. बेदाण्याचा हंगाम काही दिवसांतच सुरू होणार आहे. आतापासून त्यासाठी लागणाऱ्या बॉक्सची खरेदी केली जाते. परंतु बॉक्सच्या दरात वाढ झाली असल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
खर्च वाढणार
एक टन बेदाणा तयार करण्यासाठी २३ ते २४ हजार रुपये खर्च येतो. ही रक्कम बॉक्सच्या खर्चासह आहे. परंतु आता बॉक्सच्या किमतीत वाढ झाल्याने बेदाणानिर्मितीच्या खर्चात प्रति टनाला दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा या अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे.
प्रतिक्रिया
बेदाणा तयार झाल्यानंतर पॅकिंगसाठी बॉक्स मोठ्या प्रमाणात लागतात. यंदा बॉक्सच्या दरात वाढ झाली असल्याने बेदाणा तयार करण्याच्या खर्चात देखील वाढ झाली.
- सुनील माळी, बेदाणानिर्मिती व शेडमालक
युरोप देशातून येणारा (इंपोर्टेड वेस्ट) कच्चा माल भारतात येणे थांबला आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चा माल देशात येण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. तेव्हाच कच्च्या मालाचे दर कमी होतील.
- सुहास कुलकर्णी, बॉक्स कारखानदार, सांगली
- 1 of 30
- ››