agriculture news in Marathi rate of soybean hiked in state Maharashtra | Agrowon

सोयाबीनमध्ये तेजीचाच कल

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचा दर ४००० ते ४३०० दरम्यान मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. 

अकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू असताना बाजार समित्यांमध्ये आवकही वाढत आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचा दर ४००० ते ४३०० दरम्यान मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. 

यंदा सप्टेंबरमधील पाऊस तसेच आताच्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. मळणीच्या काळातील पावसाने सोयाबीन डागी झाले. मालाचा दर्जासुद्धा काही प्रमाणात खालावला. अशा स्थितीत चांगल्या प्रतीचे सोयाबीन खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. या भागातील बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनच्या दरात वाढ दिसून येत आहे.

यंदाच्या मोसमात १२ ऑक्टोबरला वाशीम बाजार समितीत उच्चांकी ४३११ रुपये दर मिळाला होता. त्यानंतर वाढीव दराचा ट्रेंड बाजारात टिकून आहे. आता आवक सातत्याने वाढत असली तरी दर फारसे कमी झालेले नाहीत. शनिवारी (ता.२४) वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ३६०० ते ४३५१ दरम्यान विक्री झाले. सुमारे साडेसात हजार पोत्यांची आवक झाली होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची जवळपास एवढीच आवक होती. येथे सोयाबीन ३३०० ते ४१५० रुपयांदरम्यान विक्री झाले. सरासरी ३९०० रुपये दर मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सोयाबीनची २७४० क्विंटल आवक होती. येथे सोयाबीन ३००० ते ४२६० रुपये दर मिळाला.

सध्या सोयाबीन काढणी वेगाने सुरु झालेली आहे. परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात या भागात धुमाकूळ घातल्यानंतर आता पाऊस सर्वत्र ओसरला आहे. यामुळे सोयाबीन मळणीचे काम वेगाने सुरु झाले. मळणीनंतर जागोजागी सोयाबीन चुकविण्याचेही कामही केले जात आहे. आणखी आठवडाभर हा हंगाम जोमात राहणार आहे. 

दरवाढीची शक्यता
शेतीमाल बाजार विश्‍लेषक श्रीकांत कुवळेकर म्हणाले, की मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सात ते पंचवीस टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे अंदाज येत आहेत. तर बाजारातील आवकदेखील मागील वर्षाच्या तुलनेत २०-२५ टक्के कमीच आहे. दर्जानुसार ४,४५० रुपये क्विंटलचा भाव मिळाल्याची माहिती आहे. तर जागतिक बाजारात देखील पुढील सहा महिन्यांतील सोयाबीन पुरवठ्यावर ला-निना या हवामान संकटामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाल्यामुळे सोयाबीन अनेक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. चीनच्या खाद्यतेल क्षेत्रातील मागणी-पुरवठा असंतुलनामुळे मागणी वाढतीच राहण्याची अनुमाने आहेत. त्यामुळे चॉइस ब्रोकिंग आणि इतर काही दलाल कंपन्यांनी सोयाबीनमध्ये येत्या काही महिन्यांत ८-१० टक्के तेजीची शक्यता वर्तवली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...