वाईत हळदीला दहा हजारांवर दर

At a rate of ten thousand to turmeric in wai
At a rate of ten thousand to turmeric in wai

वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची आवक सुरू झाली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते लिलावाचा सोमवारी (ता. १७) प्रारंभ झाला. या वेळी मोहनशेठ ओसवाल यांच्या काट्यावर उत्तम पिसाळ यांच्या हळदीला प्रति क्विंटल दहा हजार १११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. 

मार्केटवर १२८३ पोती नवीन हळदीची आवक झाली. हळदीचा दर प्रति क्विंटल ७,५०० ते १०,११२ रुपये इतका निघाला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पिसाळ म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी हळद निवडून स्वच्छ करून, वाळवून मार्केट यार्डवर लिलावासाठी आणावी. मार्केटच्या आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर शेतकऱ्यांनी मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापाऱ्यांना नियमितपणे लिलाव काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.’’

खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ, ऍड. उदयसिंह पिसाळ, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, कांतिलाल पवार, मोहन जाधव, संचालक विक्रमसिंह पिसाळ आदी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com