कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
ताज्या घडामोडी
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा हजारांचा दर
नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात तुरीला प्रतिक्विंटल ६००० ते ६ हजार २५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला.
नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात तुरीला प्रतिक्विंटल ६००० ते ६ हजार २५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. गेल्या आठवडाभरात लसणाच्या दरातही काहीशी सुधारणा झाली. भाजीपाल्याच्या आवकेत व दरात चढउतार मात्र सुरुच होता.
गेल्या आठवभरात तुरीची आवक बऱ्यापैकी होती. मुगाची दर दिवसाला ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन ६००० ते ६५०० रुपयांचा दर मिळाला. गावरान ज्वारीची ६० ते ७० क्विटंलची आवक होऊन २३०० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची ४० ते ५० क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला. उडदाची दहा ते १५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार ६०० रुपयांचा दर मिळाला.
लाल मिरचीची आवक ५० ते ६० क्विटंलची दर दिवसाला आवक होत आहे. मागील आठवड्यात लाल मिरचीला ६ हजार २०८ ते १३ हजार ९५ रुपयांचा दर मिळाला. गव्हाची ५० ते ६० क्लिंटलची आवक होऊन १६७५ ते १७०० रुपयांचा दर मिळाला.
सोयाबीनची २० ते ३० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्यात टोमॅटोची दर दिवसाला १०३ ते ११० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपयांचा दर मिळाला. कोबीची ७० ते ८० क्विंटलची आवक होऊन ३०० ते ४०० रुपये, काकडीची ६० ते ६५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार.
शेवगा २००० ते ३००० हजार रुपये
गेल्या आठवडाभरात दर दिवसाला लसणाची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन ६ हजार ते १३ हजार रुपयांचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ७० ते ८० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजार रुपये, शेवग्याची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, शिमला मिरचीची ५० ते ६० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
- 1 of 1065
- ››