agriculture news in marathi, rates of aambemohor rice is increase, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

सुगंधी आंबेमोहरची पुण्यात रोज सुमारे १५ टन इतकी विक्री होते. या तांदळाचा महिन्याला सुमारे ४०० टन एवढा खप आहे. मागील दीड ते दोन महिन्यात झालेल्या मोठ्या भाववाढीमुळे आंबेमोहर तांदळाचा खप कमी झालेला आहे.  
-राजेश शहा, तांदळाचे प्रमुख व्यापारी. 

पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशीमध्ये वाढत्या शहरीकरणाने भाताचे क्षेत्र घटले आहे. शेतकऱ्यांनी आंबेमोहरपेक्षा कमी कालावधीच्या इंद्रायणी वाणाला पसंती दिल्याने आंबेमोहरसाठी ग्राहकांना मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील आवकेवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, स्थानिक क्षेत्र आणि उत्पादन घटल्याने आंबेमोहर तांदळाच्या दरात किलोमागे २५ रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती पुणे बाजार समितीमधील तांदळाचे प्रमुख व्यापारी राजेश शहा यांनी दिली. जिल्ह्यातील तांदूळ स्थानिक बाजारातच विक्री होत असल्याने त्याची पुण्यातील आवकही नगण्य असल्याचे ते म्हणाले.

आंबेमोहर तांदळाला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुगंध आणि चवीमुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. सध्या तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, घाऊक बाजारपेठेत यंदा प्रथमच क्विंटलचे दर ७५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. हेच दर गेल्या वर्षी साधारणतः ५ हजार रुपये होते. राज्यात आंबेमोहरची प्रामुख्याने आवक ही मध्य प्रदेशातून ८०, तर आंध्र प्रदेशातून २० टक्के होते. या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी यंदा आंबेमोहरपेक्षा एक महिना अगोदर उत्पादन मिळत असल्याने लचकारी कोलम वाणाला पसंती दिली. यामुळे आंबेमोहरचे उत्पादन घटले आणि दरात वाढ झाली आहे. लचकारी कोलमचे दर ४२०० पर्यंत होते, तर आंबेमोहरचे दर ५ हजार रुपयांपर्यंत होते. आंबेमोहरला युरोप व अमेरिकेसह आखाती देश आणि बांग्लादेशातून मागणी वाढल्याने विक्रमी भाववाढ झाल्याचे शहा यांनी सांगितले.
 

असे आहेत दर (क्विंटल)

  • आंबेमोहर  :  ७ हजार ५०० 
  • बासमती  :  ७ हजार ५०० 
  • गावरान कोलम  :  ४ हजार 
  • इंद्रायणी  :  ४ हजार ५०० ते ५ हजार ५००
  • कोलम (एचएमटी, लचकारी) : ४ हजार ते ५ हजार

 


इतर बातम्या
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...