agriculture news in Marathi, rates of green chilly increased, nashik, maharashtra | Page 3 ||| Agrowon

नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५००० ते ८५०० रुपये

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ३७२२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ६५०० ते ८५०० तर ज्वाला मिरचीला ५००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ३७२२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ६५०० ते ८५०० तर ज्वाला मिरचीला ५००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी-जास्त निघाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली, तसेच परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक १९०१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४००० ते ५६०० दर मिळाला. तर घेवड्याला ३५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. या सप्ताहात वाळपापडी घेवड्याची आवक वाढली. गाजराची आवक १५७ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २५००  प्रतिक्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आवक १६८७५ क्विंटल झाली. बाजारभाव ६०० ते १४०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ७४८१ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १२५० प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक ११५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ११५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भुईमुगाच्या शेंगांची आवक ५४० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ६००० असा दर मिळाला. 

टोमॅटोला १५० ते ६००, वांगी १५० ते ३२५, फ्लॉवर १२५ ते २५० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी १५० ते ३०० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २०० ते ३५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १४० ते २७०, कारले ४०० ते ५५०, गिलके ३०० ते ५००, भेंडी १२० ते ३६० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला ३७५ ते ७००, लिंबू २६० ते ५००, दोडका ५०० ते ९०० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ८००० ते २४०००, मेथी २५०० ते ४२००, शेपू १००० ते १७००, कांदापात २००० ते ३६००, पालक १५० ते २५०, पुदिना १०० ते २०० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ६३१४ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून, परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. आंब्याची आवक ८५० क्विंटल झाली. दशहरी २००० ते ४८०० प्रतिक्विंटल, तर नीलम आंब्यास १९०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बटाटा १८०० ते २२०० रुपये...सांगली  : येथील विष्णूअण्णा फळे व भाजीपाला...
आटपाडी बाजार समितीत डाळिंब सौदे सुरूआटपाडी, जि. सांगली : येथील बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन आवकेत वाढ, दरात...अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात 'कोरोना’मुळे मंदावली शेतमालाची...नागपूर  ः कोरोना लॉकडाऊनचा परिणाम कळमणा...
सोलापुरात डाळिंब, लिंबुला उठाव, दर...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी वाढलीनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १८०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
औरंगाबादमध्ये मका ९२५ ते ११५५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये भुसारच्या आवकेत अजूनही घट नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
पुणे बाजार समिती मुख्य आवार रविवारपासून...पुणे : गुलटेकडी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १००० ते १३०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...