पुणे बाजारसमितीत कांदा, शेवगा, गाजराच्या दरात वाढ

पुणे बाजारसमितीत शेतीमालाची झालेली आवक
पुणे बाजारसमितीत शेतीमालाची झालेली आवक

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्याची आवक घटल्याने कांदा, शेवगा, गाजर यांच्या दरात वाढ झाली होती.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ३ टेम्पो, कर्नाटकातून श्रावण घेवडयाची २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाट्याची सुमारे ३५ ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटोची सुमारे ५ हजार क्रेट, कोबीची ५ टेम्पो, फ्लॉवरची १०, सिमला मिरची आणि भेंडीची प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, गवारीची सुमारे ५ टेम्पो, काकडीची १० टेम्पो, हिरवी मिरचीची ५ टेम्पो, गाजराची शंभर गोणी, तांबडा भोपळ्याची सुमारे ८ टेम्पो, भुईमुगाची सुमारे १५० गोणी, तसेच कांद्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) : कांदा : ३००-४००, बटाटा : १३०-१८०, लसूण : ९००-१७००, आले : सातारी ५००-७००, भेंडी : २००-२५०, गवार : ४००-६००, टोमॅटो : १५०-२५०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, काकडी : ८०-१०२, कारली : हिरवी १६०-२००, पांढरी १४०-१५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : १२०-१६०, वांगी : ३५०-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ६००-८००, गाजर : ४००-५००, वालवर : ३००-३५०, बीट : १५०-१८०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, पावटा : ४००-६००, भुईमूग शेंगा : ४००- ४५०, मटार : ११००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २४०-,२५० मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या  पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : १२०० -२२००, मेथी : १०००-१८००, शेपू : ५००-१०००, कांदा पात : ८०० -१०००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -८००, पुदिना : ५०० -८००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ८०० -१०००, चुका : ८००-१०००, चवळई : १२०० -१३००, पालक : १००० -१५००. 

फळबाजार   रविवारी (ता.२७) येथील फळ विभागात मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची ४ टन, डाळिंबाची १०० टन, कलिंगडाची २५ टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो, पपईची १५ टेम्पो, लिंबांची सुमारे दोन हजार गोणी, चिक्कूची एक हजार डाग, सीताफळाची १५ टन तर विविध बोरांची सुमारे ३० गोणी आवक झाली होती. 

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : २००-३५०, मोसंबी : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन ) : १६०-२५०, संत्रा : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन ) : ६०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश : १०-३०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिक्कू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : १०-१२०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : (२५-३० किलो) २४००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४००. बोरे - (१० किलोचे दर) चमेली - २२०-२५०, उमराण - १३०-१५०, चेकनट ७००-८००, चण्यामण्या ४००-४५०.   फूलबाजार यंदा सततच्या पावसाने फुले भिजली. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत आवक कमी राहिली. आवकेमध्ये भिजलेल्या फुलांचे प्रमाण जास्त असल्याने चांगल्या फुलांना चांगले दर मिळाले. उद्यापर्यंत फुलांना मागणी राहील. त्यामध्ये झेंडूला विशेष मागणीसह दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.  फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : १०-६०, गुलछडी : २००-३००, बिजली : ३०-६०, कापरी : २०-४०, शेवंती : ३०-१००, अ‍ॅस्टर : ८०-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-६०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लीली बंडल : २५-३५,  जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०-१००.

मासळी बाजार  गणेश पेठेमतील मासळी बाजारात रविवारी (ता.२७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीची ३०० किलो तर नदीच्या मासळीची  ४०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ५ टन आवक झाली होती. दिवाळीमुळे मागणी राहिल्याने दर स्थिर होते. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकडा ४० रुपयांनी वाढ तर चिकन, मटणाचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००, मध्यम : ८००-९००, लहान ६००, भिला :४००-४८०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ४८०-५५०, घोळ : ५२०, भिंग : ३२०, करली : २४०-२४०, करंदी : ४००, पाला : लहान -७००-८००,  मोठे - १०००-११००, वाम : लहान  पिवळी ४००, मोठे  ६००-७००,  काळी : २८०, ओले बोंबील : १००-१६०.  कोळंबी ः लहान  २०० मोठे  ४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : २४०-३६०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोर्या : ४८०-५५०. 

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ३२०, तांबोशी : ४४०, पालू : ३२०, लेपा :  लहान १००-१४० , मोठे  २४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान  १४०-१६०, मोठे  २४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १२०-१४०. 

नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १४०-१६०, मरळ :३२०, शिवडा : २००, चिलापी : ८०, खवली : २४०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ५५०.  

मटण : बोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०.  

चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.  अंडी : गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४४० डझन : ६० प्रतिनग : ५.

मंगळवारी बाजार समिती बंद  मंगळवारी (ता.२९) भाऊबीजेनिमित्त बाजार समितीमधील व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com