agriculture news in Marathi, rates increased of guar and french bean in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात गवार, घेवड्याचे दर वधारले

सुदर्शन सुतार
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, घेवड्याला चांगला उठाव राहिला. त्यांच्या दरातही पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय कांद्याचे दरही पुन्हा टिकून राहिले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची १० ते १५ क्विंटल, भेंडीची २० ते २५ क्विंटल आणि घेवड्याची ५ते १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांना सातत्याने उठाव मिळतो आहे. मागणीच्या तुलनेत आवक तशी कमीच आहे. पण मागणीत सातत्य असल्याने त्यांचे दर वधारले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, घेवड्याला चांगला उठाव राहिला. त्यांच्या दरातही पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय कांद्याचे दरही पुन्हा टिकून राहिले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची १० ते १५ क्विंटल, भेंडीची २० ते २५ क्विंटल आणि घेवड्याची ५ते १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांना सातत्याने उठाव मिळतो आहे. मागणीच्या तुलनेत आवक तशी कमीच आहे. पण मागणीत सातत्य असल्याने त्यांचे दर वधारले.

गवारला प्रतिदहा किलोसाठी १७० ते ४५० व सरासरी ३०० रुपये, भेंडीला ४० ते ३५० व सरासरी १७० रुपये आणि घेवड्याला ३५० ते ४५० व सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो यांच्या दरातही तेजी राहिली. त्यांची आवकही चांगली होती. वांग्याची साधारणपणे रोज ४० ते ५० क्विंटल, टोमॅटोची ३०० ते ४०० क्विंटलपर्यंत आवक होती. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ८० ते ५०० व सरासरी २७० रुपये तर टोमॅटोला ६० ते ३०० व सरासरी २०० रुपये असा दर मिळाला. 

भाज्यांची आवक रोज १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत आवक होती. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ८०० रुपये, मेथी ९०० ते १२०० रुपये आणि शेपूला ६०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर याही सप्ताहात टिकून राहिले. कांद्याला मागणीही वाढली. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच सर्वाधिक होती. कांद्याची रोज ७० ते १०० गाड्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ४००० व सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला.


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...