साखर कारखाने सुरु होण्याआधी दर जाहीर करावा

कारखान्यांनी ऊसतोडणीनंतर साधारण चौदा दिवसांत पैसे देण्याची हमी दिली अशाच कारखान्यांना गाळप परवाने द्यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Rates should be announced before the start of sugar mills
Rates should be announced before the start of sugar mills

नगर ः यंदाचा साखर हंगाम सुरु होण्याआधी सर्व साखर कारखान्यांची बैठक घेऊन संबंधित कारखान्यांनी किमान ३ हजार ५० रुपये एफआरपी रक्कम जाहीर करावी. तसेच ज्या कारखान्यांनी ऊसतोडणीनंतर साधारण चौदा दिवसांत पैसे देण्याची हमी दिली अशाच कारखान्यांना गाळप परवाने द्यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखाने गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर तसेच मोठ्या प्रमाणात उसाची तोड केल्यानंतरही एफआरपी जाहीर करत नाहीत. तसेच शासनाच्या नियमानुसार १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना अनेक महिने पैसे देत नाहीत. त्यामुळे यंदा साखर कारखाने सुरु होण्यापूर्वी यंदा नफा व वाढीव एफआरपी नुसार किमान ३ हजार ५० रुपये प्रती टन टन जाहीर करावी, चौदा दिवसांच्या आत उसाचे पैसे शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

तसेच गेल्यावर्षी ज्या कारखान्यांनी एफआरपी रक्कम थकवली आहे, त्यांच्याकडून १५ टक्के व्याजासह रक्कम तातडीने वसूल करुन शेतकऱ्यांना द्यावी. प्रत्येक दिवशी साखर कारखान्यातून साखर उताऱ्यांची सरकारी अधिकाऱ्यासमोरच नोंद घ्यावी. सर्व साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची शेतकरी व संघटनाच्या कार्यकर्त्यासमोर प्रमाणित करावे असे निवेदनात स्पष्ट केले आहे. याबाबत दुर्लक्ष केले तर १४ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा परदेशी यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com