पुण्यात पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्या दरात सुधारणा

पुण्यात बटाटा, घेवडा, मटार दरात हलकी सुधारणा
पुण्यात बटाटा, घेवडा, मटार दरात हलकी सुधारणा

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर होती. मात्र बटाटा, घेवडा आणि मटारची आवक तुलनेने घटल्याने दरात सुधारणा झाली होती.   परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि तमिळनाडू येथुन सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ५ टेम्पो, राजस्थानातून ८ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ५ ट्रक, मध्य प्रदेशातून मटार सुमारे १० तर ग्वाल्हेर आणि जयपूर येथून प्रत्येकी ट्रक, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे पाच हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे बटाट्याची अवघी सुमारे २० ट्रक आवक झाली होती.  स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १ हजार २०० पोती, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, भेंडी, काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, गवार ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, कांदा सुमारे १८० ट्रक आवक झाली होती.  फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : २००-२७०, बटाटा : १४०-२००, लसूण : १०००-१६००, आले : सातारी २००-४००, भेंडी : ३००-३५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली: हिरवी २००-२५०, पांढरी: १००-१८०, पापडी : १२०-१४०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ४०-६०, वांगी : २५०-३५०, डिंगरी: २००-२५०, नवलकोल: ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१४०, शेवगा : ४००-४५०, गाजर : १६०-१८०, वालवर : १४०-१६०, बीट : ६०-१००, घेवडा : १५०-२००, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३००, पावटा : ३५०-४००, भुईमूग शेंग : ६००-६५०, मटार : परराज्य ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.  फळबाजार  रविवारी (ता. २) येथील बाजारात मोसंबी ५० टन, संत्री सुमारे ३० टन, डाळिंब २५०, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, कलिंगड २५ टेम्पो, खरबुज ४ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे २०० गोणी, द्राक्षे सुमारे २५ टन, पेरु १ हजार २०० क्रेट, चिकू १ हजार डाग आवक झाली होती.  फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १५०-३००, मोसंबी : (३ डझन) : ८०-२२०, (४ डझन ) : ३०-६०, संत्रा : (३ डझन) : १२०-३५०, (४ डझन ) : ४०-१४०, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : २०-९०, गणेश : १०-३०, आरक्ता १५-४५. कलिंगड : ५-१३, खरबुज : १०-२५, पपई : ५-२०, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ९००-१४००, किन्नोर -(२५-३०) - २०००-२५००, सिमला - (२५-३०)- १८०० ते २२००, बोरे (१० किलो) : चेकनट : ६८०-७००, उमराण : ३०-५०, चमेली : ९०-१३०, चण्यामण्या : ३८०-४२०. सीताफळ ३०-११० स्‍ट्रॉबेरी (२ किलो) - ७०-१७०  पालेभाज्या  पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. २) कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, मेथीची सुमारे ५० हजार जुड्यांची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ६००-१२००, मेथी : ६००-१०००, शेपू : ३००-६००, कांदापात : ५०० -१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-८००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ७००-१०००, मुळे : ५००- १०००, राजगिरा : ७००-८००, चुका : ७००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-६००. हरभरा गड्डी -५००-८००.  फुले फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ८०-१२०, बिजली -४०-७०, कापरी : २०-३०, शेवंती : ५०-१००, अ‍ॅस्टर : १६-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : १००-१५०, लिलि बंडल : ६-१०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन - १००-२००.  मटण मासळी  गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची सुमारे २५० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर चिकन, मटणचे दर स्थिर होते. तर अंड्याचे दर थोडे कमी झाले होते, अशी माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.  खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १५००, मध्यम : ९००-१०००, लहान ७५०, भिला : ५५०-६००, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान - ६००, मोठा : ८००, घोळ : ८००, भिंग : ४००, करली : २४०-२८०, करंदी : ४००, पाला : लहान ६००, मोठे : ११००, वाम : ७५०-९००, ओले बोंबील : १२०-१८०.  कोळंबी ः लहान २८०, मोठे : ४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०, मांदेली : १२०, राणीमासा :२००-२४० खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ५५०.  खाडीची मासळी :  सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ४००-७५०,तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १२०-१४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान २०० , मोठे २८०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसर्‍या : १६०, खुबे : १४०, तारली : १६०.  नदीची मासळी :  रहू :१४०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १६०, खेकडे : २०० वाम : ५५०.  चिकन :  चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.  अंडी :  गावरान : शेकडा : ८०० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ४१० डझन : ६० प्रतिनग : ५.  मटण :  बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८० खिमा : ५८०-, कलेजी : ६४०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com