सोयाबीन बियाणे नापासचे प्रमाण ६५ टक्के

परभणी येथील कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत यंदाच्या जून महिन्या अखेरपर्यंत सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी तपासणी केलेल्या २ हजार ७८० पैकी १ हजार ८०५ नमुने (६४.९२ टक्के ) नमुने नापास ठरले आहेत.
soybean ugawan
soybean ugawan

परभणी: परभणी येथील कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत यंदाच्या जून महिन्या अखेरपर्यंत सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी तपासणी केलेल्या २ हजार ७८० पैकी १ हजार ८०५ नमुने (६४.९२ टक्के ) नमुने नापास ठरले आहेत. त्यात बियाणे कायद्याअंतर्गंतचे ११० नमुने, प्रमाणित बियाण्याचे १ हजार ४६४ नमुने आणि अन्य २३१ नमुन्यांचा समावेश आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले. कृषी विभागाच्या परभणी येथील प्रयोगशाळेत मराठवाडा विभागातील विविध पिकांच्या बियाण्याच्या उगवण शक्ती चाचणीचे परीक्षण केले जाते. यंदा जून अखेर विविध पिकांच्या बियाण्याचे एकूण ५ हजार ६३३ नमुने प्राप्त झाले. त्यात सोयाबीनचे ३ हजार बियाणे नमुने आहेत. एकूण ४ हजार ८४७ नमुन्यांची उगवण शक्ती तपासली. त्यापैकी १ हजार ९५९ बियाणे नमुने नापास ठरले. बियाणे कायद्याखाली ३ हजार २२७ पैकी १ हजार ८९४ नमुन्यांची तपासणी केली त्यापैकी १८९ नमुने नापास ठरले. प्रमाणित बियाण्याच्या २ हजार ५५२ नमुन्यांची तपासणी केली त्यापैकी १ हजार ५२२ नमुने नापास ठरले. इतर नमुन्यांमध्ये ४०१ पैकी २४८ नमुने नापास ठरले. पीकनिहाय नापास बियाणे नमुन्यांमध्ये मुगाचे २१९ पैकी ३१ नमुने नापास ठरले तर उडदाचे २२५ पैकी ९ नमुने नापास ठरले. तुरीच्या ३१९ पैकी ४८ नमुने नापास ठरले. ज्वारीच्या १२८ पैकी ८ नमुने, बाजरीचे ६९ पैकी ३ नमुने, मक्याचे १२३ पैकी २ नमुने नापास ठरले. संकरित कपाशीचे ७९४ पैकी १३ नमुने, सुधारित कपाशीचे १४ पैकी ६ नमुने ठरले. बीटी कपाशीच्या तपासणी केलेल्या ८५ पैकी २६ नमुने तर नॉन बीटी कपाशीचे २४ पैकी ६ नमुने नापास ठरले. गतवर्षी ऐन काढणीच्या वेळी झालेल्या पावसात भिजल्यामुळे तसेच इतर काही कारणांनी अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. सोयाबीनचे एकूण ३ हजार नमुने प्राप्त झाले. त्यात बियाणे कायद्याअंतर्गतचे ८८३ नमुने, प्रमाणित बियाण्याचे १ हजार ८७३ नमुने, इतर २४४ नमुन्यांचा समावेश आहे. एकूण २ हजार ७८० नमुन्यांची तपासणी नंतर बियाणे कायद्याअंतर्गत ११० नमुने नापास ठरले, प्रमाणित बियाण्याचे १ हजार ४६४ नमुने आणि इतर २३१ नमुने असे एकूण १ हजार ८०५ नमुने नापास ठरले.  ...तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते मे महिन्यात उगवणशक्ती कमी येत असल्यामुळे यंदा बियाणे कायद्याअंतर्गत बाजारातील बियाण्याचे (सॅम्पलिंग) नमुने काढून जून च्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे चाचणीचे अहवाल येण्यास विलंब झाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु अनेक ठिकाणी निकृष्ट बियाण्यामुळे उगवण कमी झाली. पेरणीपूर्वी उगवणशक्ती अहवाल प्राप्त झाले असते तर नापास बियाण्याच्या लॉट ची विक्री थांबविता (स्टॅाप सेल) आली असती. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे निकृष्ट बियाण्यामुळे झालेले नुकसान टळले असते, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com