मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
रत्नागिरी-८ भात जातीची सहा राज्यांकडून शिफारस
रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २८ टन भात बियाण्यांचे विक्रमी उत्पादन केले आहे. संशोधन केंद्राने तयार केलेल्या विविध भात बियाण्यापैकी रत्नागिरी-८ (सुवर्णा-मसुरा) या भात जातीची सहा राज्यांसाठी शिफारस केल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली.

यावर्षी जिल्हा व परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाण्याची मागणी केंद्राकडे केली. तसेच राज्यातील बीज कंपन्यानाही संशोधन केंद्राकडे बियाण्यांची मागणी केली होती. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुधारित भात जातींच्या लागवडीचे नियोजन केले आहे. कृषी संशोधन केंद्राकडे भाताच्या रत्नागिरी २४, रत्नागिरी ७३, रत्नागिरी ७११, रत्नागिरी १, रत्नागिरी ४, रत्नागिरी ३, रत्नागिरी-८, कर्जत ६, कर्जत ५ आणि समुद्रसपाटीचा भाग असल्यामुळे खार जमिनीसाठी पनवेल- १, २, ३, या जातींना दरवर्षी वाढती मागणी आहे. यंदाच्या वर्षी विद्यापीठाने रत्नागिरी -८ या जातीचे १६० टन बियाणे तयार केले. या जातीला तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओरिसा या सहा राज्यांनी शिफारस केली आहे.
संशोधन केंद्रातून ‘मागणी तसा पुरवठा’ यावर भर देऊन गतवर्षीच्या २२ टन भात बियाण्याच्या तुलनेत यावर्षी या केंद्राने ३३ टन बियाणाचे विक्रमी उत्पादन केले. त्यातील २८ टन बियाणे केंद्रातून वितरित करण्यात आले. यावर्षी सावंतवाडी- २ टन, राजापूर -१ टन, लांजा- दीड टन, कणकवली-२ टन, खेड- दीड टन, चिपळूण - अडीच टन, तर परजिल्ह्यात पोलादपूर - २ टन, महाड-५०० किलो, दापोली १ टन अशी विक्री झाला आहे. यावर्षी संशोधन केंद्राने इतर केंद्रांच्या तुलनेत ३३ टन भात बियाणांचे विक्रमी उत्पादन केले. त्यापैकी २८ टन भात बियाणे शेतकऱ्यांसह राज्यातील विविध भात बियाणे कंपन्यांना देण्यात आले.