रत्नागिरीत जिल्ह्यात प्रवासी पाससाठी प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात अन्यभागात गेलेल्या मूळनिवासी आणि जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना परराज्य, परजिल्ह्यात जाण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरीत जिल्ह्यात प्रवासी पाससाठी प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरीत जिल्ह्यात प्रवासी पाससाठी प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यात अन्यभागात गेलेल्या मूळनिवासी आणि जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना परराज्य, परजिल्ह्यात जाण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मुंबई, पुण्यासह अन्य भागात नोकरी आणि शिक्षणासाठी गेलेल्यांना मूळगावी आणण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करत आहे. जिल्ह्यातून परजिल्ह्यात आणि परजिल्ह्यातून रत्नागिरीत येणाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी लिंक दिली जाणार आहे. त्यावर संबंधित व्यक्तीने नाव पत्ता, कुठून कुठे जाणार त्याची माहिती भरावयाची आहे. ही लिंक प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे परजिल्ह्यातून येतील त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी त्या त्या गावातील ठिकाणे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तशा सूचना तालुकास्तरावर दिल्या आहेत. गावात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्याची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिल्यानुसार रात्नागीतून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाणार असाल तर पुढील लिंकवर आपली नोंदणी करावी. https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6. दुसरा राज्यातून किंवा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येत असाल तर खालील लिंकवर नोंदणी करावी. https://forms.gle/PHc7wRCpe5tqe4cM6. तसेच त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याकडे परवान्यासाठी संपर्क करावा आणि परवानगी पास घेऊनच प्रवास करावा.

या बाबत अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नियंत्रण कक्षात 02352- 222233 /226248,  7057222233 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com