रत्नागिरीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये

रत्नागिरीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये
रत्नागिरीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये

रत्नागिरी ः कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये हिरवी मिरचीची आवक वाढली आहे. सध्या हिरवी मिरचीला प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

जून महिन्यात पाऊस सुरू झाला की भाजीपाल्याची आवक कमी होते. रत्नागिरी जिल्ह्यात कोथिंबिरीची २५०० नग आवक झाली आहे. जुडीचा १५ ते २५ रुपये इतका मिळाला. मागील आठवड्यातील दरापेक्षा पाच ते सात रुपयांनी वाढ झालेली आहे. 

कोबीची ३८ क्विंटल आवक झाली असून, क्विंटलचा दर १००० ते १५०० रुपये आहे. टॉमेटो १५० क्विंटल आवक असून २००० ते ३००० रुपये दर आहे. मागील आठवड्यापेक्षा एक हजार रुपयांनी त्यात घट झाली आहे. या आठवड्यात गवारीची आवकच झालेली नाही. ४६ क्विंटल ढोबळी मिरचीची आवक झाली असून दर ३००० ते ३५०० रुपये आहे. 

फ्लॉवरची आवक ५५ क्विंटल झाली असून दर २५०० ते ३०००, गतवेळपेक्षा त्यात पाचशे रुपयांची घट आहे. भेंडीची १३ क्विंटल आवक असून दर २००० ते २५०० रुपये. भेंडीच्या दरातही पाचशे रुपयांची घट झाली आहे. वांगीची आवक ५८ क्विंटल असून दर १००० ते २००० रुपये आहेत. 

गतवेळेपेक्षा वांगीचे दर स्थिरावलेले आहेत. हिरवी मिरची आवक ३८ क्विंटल असून दर ४००० ते ६००० रुपये आहेत. मागील आठवड्यात ते दर ४००० ते ४५०० रुपये होते. रत्नागिरीत मेथीची आवक झालेली नाही. कारली १३ क्विंटल आवक असून ४००० ते ५५०० रुपये पाचशे रुपये आहे. 

पावसाने पाठ फिरवली असली, तरीही जूनच्या मध्यात भाजीची आवक रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कमी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लागणारी भाजी पश्‍चिम महाराष्ट्रासह बेळगावमधून आणली जाते. ट्रक भरून आणलेल्या भाजीपाल्याचा रत्नागिरीतील बाजार समितीमध्ये लिलाव केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com