रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला पावसाने झोडपले 

सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह राजापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. काजळी नदीला पूर आला आहे. हातखंबा, निवळी, चांदेराई यासह रत्नागिरी शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले.
रत्नागिरी, संगमेश्‍वर,  राजापूरला  पावसाने झोडपले  Ratnagiri, Sangameshwar, Rajapur was lashed by rains
रत्नागिरी, संगमेश्‍वर,  राजापूरला  पावसाने झोडपले  Ratnagiri, Sangameshwar, Rajapur was lashed by rains

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह राजापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. काजळी नदीला पूर आला आहे. हातखंबा, निवळी, चांदेराई यासह रत्नागिरी शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून दुचाकीसह आणि एक चार चाकी गाडी वाहून गेली. सुदैवाने गाडीतील प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले होते.  जिल्ह्यात मागील चोवीस तासांत सरासरी ९८.६९ मिमी नोंद झाली. मंडणगड ५१, दापोली ९९.७०, खेड ७९.८०, गुहागर ९७.९०, चिपळूण ३२.४०, संगमेश्वर १२३.९०, रत्नागिरी १९३.३०, राजापूर ११४.८०, लांजा ९५.४० मिमी पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्या‍बरोबर पावसाचा जोरही वाढत गेला. मध्यरात्रीपर्यंत पावसाचे तांडव सुरूच होते. यामुळे रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी माती घसरण्याच प्रकार घडले. काजळी नदीने रात्री बारा वाजता धोक्याची पातळी ओलांडली होती. पुलाला पाणी लागले. बाजारात पाणी भरण्याची शक्यता होती. सोमेश्वर मोहल्ल्यात पाणी शिरले होते. टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती होती. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी जात होते. रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट, बाजारपेठ परिसरात पावसाचे पाणी शिरले पाच घरांचे स्थलांतर करण्यात आले.  संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्यामुळे रस्ता बंद झाला. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे रस्ता बंद केला. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळले. रत्नागिरी तालुक्यात निवळी येथे डोंगरातून आलेले चिखलाचे पाणी चार घरात शिरले. तसेच पावसाचे पाणी सुभाष शिंदे यांच्या घरात शिरुन मोठे नुकसान झाले. हातखंबा येथील दोन घरात नदीच्या पुराचे पाणी घुसले होते. चोहोबाजूने पाणीच पाणी असल्यामुळे घरात अडकून पडलेल्या एका व्यक्तीला ग्रामस्थांचे रेस्क्यू करण्यात आले. हरचिरी मार्गावर दरड कोसळल्याने चार वाड्यांचा संपर्क तुटला. सायंकाळी उशिरापर्यंत दरड काढण्याचे काम सुरू होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com