Agriculture news in marathi Ratnagiri, Sangameshwar, Rajapur was lashed by rains | Agrowon

रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला पावसाने झोडपले 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह राजापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. काजळी नदीला पूर आला आहे. हातखंबा, निवळी, चांदेराई यासह रत्नागिरी शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले.

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह राजापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. काजळी नदीला पूर आला आहे. हातखंबा, निवळी, चांदेराई यासह रत्नागिरी शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून दुचाकीसह आणि एक चार चाकी गाडी वाहून गेली. सुदैवाने गाडीतील प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले होते. 

जिल्ह्यात मागील चोवीस तासांत सरासरी ९८.६९ मिमी नोंद झाली. मंडणगड ५१, दापोली ९९.७०, खेड ७९.८०, गुहागर ९७.९०, चिपळूण ३२.४०, संगमेश्वर १२३.९०, रत्नागिरी १९३.३०, राजापूर ११४.८०, लांजा ९५.४० मिमी पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्या‍बरोबर पावसाचा जोरही वाढत गेला. मध्यरात्रीपर्यंत पावसाचे तांडव सुरूच होते.

यामुळे रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी माती घसरण्याच प्रकार घडले. काजळी नदीने रात्री बारा वाजता धोक्याची पातळी ओलांडली होती. पुलाला पाणी लागले. बाजारात पाणी भरण्याची शक्यता होती. सोमेश्वर मोहल्ल्यात पाणी शिरले होते. टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती होती. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी जात होते. रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट, बाजारपेठ परिसरात पावसाचे पाणी शिरले पाच घरांचे स्थलांतर करण्यात आले. 

संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्यामुळे रस्ता बंद झाला. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे रस्ता बंद केला. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळले. रत्नागिरी तालुक्यात निवळी येथे डोंगरातून आलेले चिखलाचे पाणी चार घरात शिरले. तसेच पावसाचे पाणी सुभाष शिंदे यांच्या घरात शिरुन मोठे नुकसान झाले.

हातखंबा येथील दोन घरात नदीच्या पुराचे पाणी घुसले होते. चोहोबाजूने पाणीच पाणी असल्यामुळे घरात अडकून पडलेल्या एका व्यक्तीला ग्रामस्थांचे रेस्क्यू करण्यात आले. हरचिरी मार्गावर दरड कोसळल्याने चार वाड्यांचा संपर्क तुटला. सायंकाळी उशिरापर्यंत दरड काढण्याचे काम सुरू होते.
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...