agriculture news in marathi In Ratnagiri taluka there is no grain in the paddy cap | Page 4 ||| Agrowon

रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत दाणाच भरला नाही !

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार पावसासामुळे भाताच्या लोंबीत ‘दाणा’च (चिम) भरला नसल्याची स्थिती रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी आढळून आली आहे. त्याचा भात उत्पादकतेवर परिणाम झाला आहे.

रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार पावसासामुळे भाताच्या लोंबीत ‘दाणा’च (चिम) भरला नसल्याची स्थिती रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी आढळून आली आहे. त्याचा भात उत्पादकतेवर परिणाम झाला आहे.

यंदा खरीप हंगामात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात यंदा खंड पडू दिला नव्हता. शेतीचीही कामे अगदी वेळेत सुरू झाली. जुलै महिन्यात अतिमुसळधार पावसामुळे नदी किनारी भागातील भातशेतीला मोठा फटका बसला. मात्र अन्य तालुक्यांमध्ये स्थिती समाधानकारक होती. यावर्षी तुलनेत भातपिकावर किड रोगांचा प्रादुर्भाव कमी होता.

जिल्ह्यात ४८२ गावांतील ६६३७ शेतकर्‍यांचे १ हजार ३६४.३३ हेक्टरपेक्षा अधिक पीकक्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या भात शेतीची कापणी वेगात सुरू आहे. सुमारे ४५ ते ५० टक्के भातकापणी पूर्णत्वास गेल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे. 

या हंगामात पर्जन्यमान चांगले राहिले, भातरोपेही चांगली पोसली. पण भाताला फुलोरा येण्याच्या काळात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादनावर परिणाम झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे येथे काही शेतकऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

भाताला लोंब आली, पण त्यात दाणे अल्प तर उर्वरित ‘चिम’ अशी अवस्था पाहून शेतकरी गलितगात्र झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात वेतोशी येथे कृषी विभागाकडून भात पिक प्रयोग केला होता. त्यामध्येही गुंठ्याला ३० क्विंटल भात मिळाले आहे. अपेक्षेपेक्षा कमी भात मिळाले असून, त्याला शेवटच्या टप्प्यात पडलेला पाऊसच कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरवर्षी चांगले भातपीक हाती मिळेल, यासाठी शेतकरी खरिपात मोठे कष्ट घेतो. संकरित बियाणी, खते, अलीकडे यांत्रिक अवजारांचाही वापर करून शेतीसाठी मोठी मेहनत घेत असताना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असते. या वेळेस तर चांगला पाऊस पडला, चांगले भातपीक उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. भात बियाण्यांतील भेसळ की त्यावर रोगाचा, धुवाधार पावसाचा परिणाम असा प्रश्‍न उभा आहे. या शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाने आढावा घेण्याची गरज आहे. 
- तानाजी कुळ्ये, शेतकरी

भात व अन्य पिकावर दाणा तयार होण्याच्या काळात जर जोरदार पावसाचे प्रमाण राहिले तर दाणा तयार होण्यावर परिणाम जाणवतो. या वेळेस पीक फुलोरा तयार होण्याचा कालावधी व जोरदार पावसामुळे अशा प्रकारे पोचट भाताच्या पीक उत्पादनाची स्थिती निर्माण होऊ शकते. पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे.
- एन. व्ही. हेगडे, तालुका कृषी अधिकारी


इतर ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...