Agriculture news in marathi, In Ratnagiri, unseasonal rains broke the canopy | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरीत अवकाळी पावसाने मोडले कंबरडे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मंगळवारी (ता.२३) देखील जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला विजांच्या कडकडाटासह अवकाळीने झोडपून काढले.

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मंगळवारी (ता.२३) देखील जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला विजांच्या कडकडाटासह अवकाळीने झोडपून काढले. सतत पडत असलेल्या पावसामुळे नाचणी पिकाला कोंब फुटले. आंबा, काजूला आलेला मोहोर काळवंडला आहे. 

दरम्यान, आणखी दोन ते दिवस अवकाळीचे संकट राहील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. गेल्या पंधरा, वीस दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, असा अवकाळीचा दिनक्रम बनला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी यांसह अन्य तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. 

फवारण्या गेल्या वाया

आंबा, काजू बागायतदारांनी पालवी आणि मोहोरावर कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या होत्या. परंतु या फवारण्या सतत पडणाऱ्या पावसामुळे वाया गेल्या आहेत. सध्या वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. परंतु दररोज पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फवारणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.
 


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...