Agriculture news in marathi Ratnagiri of 'ZP' 80 crore loss | Agrowon

रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात पूर, दरड कोसळून जिल्हा परिषद मालमत्तेचे सुमारे ८० कोटींचे नुकसान झाले. शिवाय विविध तेराशे पशुधनाचा मृत्यू झाल्यामुळे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. 

रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात पूर, दरड कोसळून जिल्हा परिषद मालमत्तेचे सुमारे ८० कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय विविध तेराशे पशुधनाचा मृत्यू झाल्यामुळे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. 

अतिवृष्टी, महापुराचा सर्वाधिक फटका चिपळूणला शहरासह ग्रामीण भागाला बसला आहे. व्यापारी वर्गाला नुकसानीतून बाहेर पाडण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल. रत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागात पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेचे ६६ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात दरड कोसळून रस्ते खचले आहेत. २६९ रस्ते, ८१ पूल आणि मोऱ्या, ३७ साकव, १३ इमारती मिळून ४०० ठिकाणचे नुकसान झाले आहे.

फक्त रस्त्याचे सुमारे ३९ कोटी १० लाख नुकसान आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सुमारे ७ कोटींचे नुकसान आहे. त्यात ७४ पाणी पुरवठा योजना आणि ३७ विहिरींचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या ३ आरोग्य केंद्राचे पाच लाखाचे नुकसान झाले. पावसात ४१ शाळा बाधित झाल्या असून, १९ संरक्षक भिंत, सात शौचालये आणि ४ किचन शेड पडले आहेत. शिक्षण विभागाचे २ कोटी २२ लाखांचे नुकसान आहे. अंगणवाडीच्या ३५ इमारतींना फटका बसला असून, २५ अंगणवाडीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ घेतलेल्या १२ घरांचे ४४ लाखांचे नुकसान झाले आहे. 

पुराचे पाणी भात शेतात घुसून १९९.९१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. फळ झाडांचे साडेपाच हेक्टर तर इतर पिकांचे सुमारे तीन हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे. भातशेतीत गाळ साचल्यामुळे दुबार पिकांची शक्यता नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 
 

तेराशे जनावरांचा मृत्यू 
पुरात वाहून किंवा दरड कोसळून विविध प्रकारची सुमारे तेराशे जनावरे मृत पावली आहेत. त्यामुळे सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यात ९८ गाई, बैल तर ३९ म्हशी व रेडे, ५४१ कोंबड्या, १० शेळ्यांसह अन्य ६८९ जनावरे मृत पावली आहेत.

  • असे झाले नुकसान
  • पूल वाहून वाड्यांचा संपर्क तुटला 
  • इंदिरा आवसाची घरे कोसळली 
  • योजना वाहून गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 
  • सर्वाधिक नुकसान रस्त्यांचे 

इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...