Agriculture news in marathi Ravalgaon's Jadhavas feel the need for 111 sacks of wheat | Agrowon

रावळगावच्या भावसा जाधव यांनी गरजूंना वाटला १११ पोते गहू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने अनेक शेतमजूर तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक घटकांचा रोजगार संपुष्टात आले आहे, अशा परिस्थितीत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच परिस्थितीत जिल्ह्यातील रावळगाव (ता. मालेगाव) येथील शेतकरी व इलेक्ट्रिक व्यावसायिक भावसा जाधव यांनी गरजूंसाठी १११ पोती गहू वाटप केला आहे. या अडचणीच्या काळात आधार ठरले आहेत. 
 

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने अनेक शेतमजूर तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक घटकांचा रोजगार संपुष्टात आले आहे, अशा परिस्थितीत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच परिस्थितीत जिल्ह्यातील रावळगाव (ता. मालेगाव) येथील शेतकरी व इलेक्ट्रिक व्यावसायिक भावसा जाधव यांनी गरजूंसाठी १११ पोती गहू वाटप केला आहे. या अडचणीच्या काळात आधार ठरले आहेत. 
   
मूळचे सातमाणे येथील असलेले श्री. जाधव व्यवसायाच्या निमित्ताने रावळगाव येथे स्थायिक आहेत. ते आपल्या शेतावर चकरासाठी गेले असताना काही मजूर भिक्षा मागत असताना त्यांना दिसले. या गरजू घटकांना मदत करण्याची ही कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी घरी येताच त्यांचे वडील राघो जाधव यांना विचारून मदत करण्याचे ठरविले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ होकार दिला.

त्यांनी गावातील व्यापाऱ्यांकडून ३ लाख रुपयांचा १२५ पोती गहू विकत घेतला. ज्यांना गरज आहे अशा गावातील प्रत्येक गरजूंना दीड पायली म्हणजेच १० किलो इतका गहू वाटप केला. ते स्वतः शेतकरी असले तरी वाटपासाठी गहू नसताना दीड लाख आगाऊ रक्कम देऊन गहू खरेदी केला. गावात गहू वितरित करण्यासाठी प्रत्येकाला एक कुपण देऊन ‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये ही खबरदारी घेऊन गहू वाटला. त्यामुळे गरजूंना पुढील पंधरा दिवसांपर्यंतची सोय त्यांनी केली आहे. याकामी त्यांना सामाजिक भावनेने त्यांच्या मित्रपरिवार मदतीला धावून आला . 

'चला मदतीचा हात देऊ, गोर गरीबांना साथ देऊ' ही भावना जपत सामाजिक कार्याचा एक आदर्श त्यांनी घडविला आहे. अशाच प्रकारे शेकडो मदतीचे हात पुढे येऊन सामाजिक कर्तव्य पार पाडत मानुसकी जपावी, अशी भावना श्री. जाधव यांनी बोलताना व्यक्त केली.

शेती असली तरी मी सर्वसाधारण शेतकरी आहे. गरजेच्या वेळी मदत केल्यास काही कमी पडत नाही,यावर माझा विश्वास आहे. 
- भावसा जाधव, रावळगाव, ता. मालेगाव


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...